घरमुंबईबनावट स्टॅम्पचा वापर करून दुकान खरेदीत घोटाळा

बनावट स्टॅम्पचा वापर करून दुकान खरेदीत घोटाळा

Subscribe

या घोटाळ्यामध्ये उल्हासनगर मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

स्टॅम्पपेपरवर बनावट खरेदीखत बनवून दुय्यम निबंधक आणि उल्हासनगर मनपाला सादर करून दुकानांच्या व्यवहारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींसह स्टॅम्प वेंडर, उल्हासनगर मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

नक्की काय घडले?

उल्हासनगर-१ येथील मुरबाड रोडलगत हरमन मोहता कंपनीचे दोन दुकाने आहेत. २० मार्च २०१८ रोजी ही हडप करण्याच्या दृष्टीने जगदीश चिंधु म्हसकर याने मेवलाल लखन यादव या व्यक्तीशी तसेच जॉर्ज वालटर यांच्याशी संगनमत करून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खोटी माहिती देऊन स्टॅम्प वेंडर रमेश पाटील याचे कडून खोटे सही शिक्के घेतले होते. या खरेदी-विक्रीचे खोटे कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालय येथे सादर केली होती. खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी उल्हासनगर महानगरपालिकेत कर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संगनमत करून दोन दुकाने जगदीश चिंधु म्हसकर याचे नाववर केली. तसेच त्यांनी त्याची करपावती त्यांच्या नावावर केली.

- Advertisement -

या प्रकरणी अनिल तरे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जगदीश म्हसकर, जॉर्ज वालटर, मेवालाल यादव, स्टॅम्प वेल्डर रमेश पाटील आणि उल्हासनगर मनपाचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात उल्हासनगर मनपाच्या कर विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला या संदर्भात पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आलेली नाही.


हेही वाचा – रस्त्यांच्या कामात जलवाहिन्यांची तोडफोड; पाण्याची नासाडी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -