घरमुंबईरंगात रंग तो प्रेम रंग..

रंगात रंग तो प्रेम रंग..

Subscribe

थंडीच्या कडाक्यात व्हॅलेंटाईन डेचा फिवर

मुंबईसह देशभरात ‘व्हॅलेंटाईडन डे’चा फिवर बुधवारपासून चढू लागला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला सरप्राईज भेट देण्यासाठी तरुणाईची दुकानात गर्दी उसळली आहे. भेटवस्तू देण्याबरोबरच सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर फोटो व डीपी अपलोड करत असल्याने सोशल मीडियालाही प्रेमाचा रंग चढला आहे.

फेब्रुवारी आला की सगळ्यांना आठवण होते ती ‘व्हॅलेंटाईन डे’ची! प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडणारे प्रेमीयुगूल आपल्या मनातील भावना वेगवेगळ्या प्रकार व्यक्त करतात. कविता, शेरो-शायरी किंवा प्रेमाच्या गाण्यांच्या माध्यमातून तरुणाई आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. आपले प्रेम टप्याटप्प्याने व्यक्त करता यावे यासाठी ‘व्हॅलेंटाईन वीक’ साजरा केला जातो. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे, हग डे त्यानंतर आता गुरुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने या दिवशी आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला नेमकी कोणती भेटवस्तू द्यायची? हा प्रत्येकालाच पडणारा प्रश्न. प्रत्येकाचा बाजारपेठेत हटके वस्तू घेण्यासाठी बाजारपेठही सज्ज झाल्याचे दिसून आली आहे.

- Advertisement -

‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये यंदाही मार्केटमध्ये तरुणाईचे लक्ष वेधून घेतील असे गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, की-चेन्स, टेडी  चॉकलेट्स, चॉकलेट बुके, फ्रेश फ्लॉवर्स बुके, प्रिंटेड टी-शर्ट आणि इतर हटके भेट वस्तू अधिक घेण्याकडे तरुणाईचा कल दिसून आला. आजची तरुण पिढी ही डिजिटल माध्यमांचा सर्रास वापर करत असल्याने मार्केट्समध्ये जाऊन भेटवस्तू खरेदी करण्याऐजवी ऑनलाईन खरेदी करत आहेत. त्यात विविध शॉपिंग्स अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध असल्याने प्रियकराला किंवा प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडत आहे. ऑनलाईनच्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्टींमध्ये परफ्यूम, ट्रेडिशनल वेअर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा गोष्टींना सर्वाधिक पसंती मिळत आहे. याशिवाय म्युझिकल ग्रीटिंग्स व नाविन्यपूर्ण गिफ्ट्स देखील उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाईनडेसाठी पारंपरिक भेटवस्तूंची मागणी तर आहेच परंतु डिजिटल भेटवस्तूंची अधिक क्रेझ बाजारपेठेत बघायला मिळत आहे. लाल गुलाबांचे बुके, लाल रंगाचे हार्टशेपचे फुगे, टेडी यांस नेहमी मागणी असतेच. परंतु भेटवस्तूंचा गोडवा वाढवण्यासाठी सर्वांच्या पसंतीचे हार्टशेप आकाराचे परदेशी चॉकलेट्स यंदा बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. व्हॅलेंटाईन डे हा ठराविक कोणत्या एका वयोगटासाठी नसल्याने भेटवस्तूंच्या दुकानात तरुणांपासून वयोवृद्ध देखील खरेदीचा आनंद घेताना दिसत आहे.

व्हॅलेंटाईनमय सोशल मीडिया

संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक साजरा करतांना तरुण मुलांसोबत इतर वयोगटातील प्रत्येकाने व्हॉट्सअँपवर आपल्या प्रिय व्यक्तीकरिता सोबत घालवलेल्या क्षणांचे फोटोस, रोमँटिक गाणी आणि गाण्यांच्या ओळी डेडिकेट करत आहे. तर फेसबुकवर हॅश टॅग वापरून व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तींसाठी स्पेशल पोस्ट, फोटोस आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -