घरमुंबईविकास नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंतापदी विनोद चिठोरे

विकास नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंतापदी विनोद चिठोरे

Subscribe

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील प्रमुख अभियंत्यांची खांदेपालट महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केली असून यामध्ये विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता राजेंद्र झोपे यांची बदली दक्षता विभागात करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुन्हा एकदा विनोद चिठोरे यांची वर्णी लावली आहे. तर रस्ते वाहतूक व पूल अशा तीन विभागांचा परभार स्वीकारणार्‍या संजय दराडे यांच्याकडील पूल व पर्जन्य जलवाहिनी विभागाची जबाबदारी कमी करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंतापदी विकास नियोजन विभागाचे उपप्रमुख अभियंता संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पूल विभागाच्या प्रमुख अभियंतापदी बाळासाहेब साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभाग, दक्षता, रस्ते व वाहतूक, पर्जन्य जलवाहिनी विभाग, एम.सी.आर तसेच इतर केंद्राच्या प्रमुख अभियंतापदांसाठी महापालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी नियुक्ती आदेश जारी केले आहेत. येत्या ३१ डिसेबर २०१९ला जलअभियंता श्रीकांत अरगडे हे सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी अजय राठोर यांची जलअभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जलअभियंता पदाची ही नियुक्ती १ जानेवारी २०२०पासून लागू होईल,असे नियुक्ती पत्रांमध्ये नमुद करण्यात आली आहे.

- Advertisement -

अधिकारी आणि नवीन बदलीचा विभाग तसेच खाते
•राजेंद्र झोपे : प्रमुख अभियंता (दक्षता)
•विनोद चिठोरे : प्रमुख अभियंता (विकास नियोजन)
•संजय दराडे : प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक)
•संजय जाधव : प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी)
•बाळासाहेब साळवे : प्रमुख अभियंता (पूल)
•अजय राठोर : जलअभियंता-१ जानेवारी २०२०पासून
•अरुण भोईर : प्रमुख अभियंता (एम.सी.एम.सी.आर)
•विवेक मोरे : प्रमुख अभियंता (ना.प्र.सं व सं.कें)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -