घरमुंबईमनसे राष्ट्रपती दरबारी

मनसे राष्ट्रपती दरबारी

Subscribe

राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील बंद असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाप्रकरणी आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. राज्यपालांनी यासाठी दोन पदांची नेमणूक केल्यानंतरही हे कक्ष अद्याप सुरु न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट राष्ट्रपती दरबारी याची तक्रार केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

मनसेच्या या तक्राराची दखल राष्ट्रपती कायार्लयाने देखील घेतली असून लवकरात लवकर हे कक्ष सुरु करण्याचे निर्देश राष्ट्रपती सचिवालयातर्फे देण्यात आले आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष लक्षात घेता राज्यात गेल्या दहा दिवसांपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद असल्याने त्याचा थेट फटका राज्यातील हजारो रुग्णांना बसला आहे. हे कक्ष बंद असल्यामुळे राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना हवी असलेली मदतीपासून वंचित राहिले असल्याने अनेकांना उपचार मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे.

- Advertisement -

त्यामुळे हे कक्ष लवकारात लवकर सुरु व्हावे यासाठी अनेक जणांनी मागणी केल्यानंतर राज्यपालांकडून या कक्षासाठी दोन विशेष पदांची नेमणूक केली होती. मात्र त्यानंतरही हे कक्ष सुरु न झाल्याने सोमवारी मंत्रालयात अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन पेडणेकर यांनी याप्रकरणी थेट राष्ट्रपती सचिवालयात तक्रार केली असून याची गंभीर दखल राष्ट्रपती कार्यालयाकडून घेण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -