घरमुंबईठाण्यात दुचाकी फेरीद्वारे मतदान जनजागृती अभियान

ठाण्यात दुचाकी फेरीद्वारे मतदान जनजागृती अभियान

Subscribe

ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे म्हणून जनजागृतीसाठी आज, शनिवारी दुचाकी फेरी काढण्यात आली.

ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे म्हणून जनजागृतीसाठी आज, शनिवारी दुचाकी फेरी काढण्यात आली. शंभरहून अधिक दुचाकीस्वार त्यात सहभागी झाले होते. आरफोरसी या सामाजिक संस्थेचे शंभरहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त आणि सहायक निवडणूक अधिकारी डॉ. चारूशीला पंडित, सहायक आयुक्त आणि सहायक निवडणूक अधिकारी डॉ. अनुराधा बाबर आदी उपस्थित होते.

सामाजित संदेश देत जनजागृती

गेली ३० वर्षे आपल्या बाईकवरून संपूर्ण महाराष्ट्रभर मतदान जनजागृती करणारे पुण्याचे बापूराव गुंड हे या बाईक रॅलीचे मुख्य आकर्षण होते. ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानात सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन गुंड यांनी मतदारांना यावेळी केले. ‘सारे काम छोड दो, सबसे पहिले वोट दो, बाते अभी अधुरी है, वोट देना जरूरी है’, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून ते आपण पार पाडले पाहिजे, आदी जनजागृतीपर संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथून फेरीला सुरूवात झाली. तिथून पुढे तलाव पाळी, राम मारुती रोड, गोखले मार्ग, तीन हात नाका, वागळे इस्टेट मार्गे अँप्लाब सर्कल,पासपोर्ट केंद्र, कोरे टॉवस, उपवन तलाव, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हॅपी व्हॅली, मानपाडा, ब्रह्मांड, कोलशेत रोड, बाळकुम अग्निशमन केंद्र, कापूरबावडी, कोर्ट नाका, तलाव पाळी या मार्गे राम गणेश गडकरी रंगायतन येथे या फेरीची सांगता करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -