घरमुंबईगोरेगावातील भीषण आगीत गोदामे, झोपड्या खाक

गोरेगावातील भीषण आगीत गोदामे, झोपड्या खाक

Subscribe

मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास आग लागली.

पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्वच्या सामना परिवार येथील भागात भंगार गोदामांना लागलेल्या भीषण आगीत काही गोदामे, दुकाने, झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे. नजीक असलेली झोपडपट्टी या आगीपासून बचावली आहे. यासंदर्भांतील माहिती उपमहापौर सुहास वाडकर यांनी आपलं महानगरच्या प्रतिनिधींनीशी बोलताना दिली. प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व), अरुण कुमार वैद्य मार्ग, खडकपाडा, सामना परिवार, रत्नागिरी हॉटेल, टारमेंट कंपनीच्या बाजूला वसलेल्या भंगार गोदामांना मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास आग लागली. १५ ते २० हजार चौरस फूट जागेतील भंगार मालाची गोदामे, झोपड्या, कारपेंटरची दुकाने आदींना आग लागली. ही आग हळूहळू पसरली व भडकली.

भीषण आग व काळ्या धुराचे लोट यामुळे त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. मात्र, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन गर्दीला हटवले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचावकार्य सुरू केले. परंतु, आगीची भीषणता वाढल्याने सायंकाळी ७.१७ वाजता आगीचा स्तर-२ झाल्याचे घोषित करण्यात आले. अर्ध्या तासात आग आणखीन भडकल्याने सायंकाळी ७.४६ वाजताच्या सुमारास आगीचा स्तर-३ झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ फायर इंजिन, ७ जंबो वॉटर टँकरच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली. उपमहापौर सुहास वाडकर यांना आगीबाबतची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही आग कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलामार्फत चौकशी सुरू आहे.

नवी मुंबईत खासगी कंपनीला आग

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात एका खासगी कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीत कंपनी खाक झाली आहे. कंपनीत लागलेली आग ही शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -