घरमुंबईठाण्यात पाणीबाणी; शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

ठाण्यात पाणीबाणी; शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Subscribe

ठाणे शहराला २२ जानेवारी रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या पिसे येथे अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या मुठवळ गावाजवळ पेट्रोलियमची लाईन टाकण्यासाठी खोदकाम करत असताना पाण्याची गळती सुरू झाली आहे. सदरची लाईन तातडीने दुरूस्त करण्‍याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ठाणे महापालिकेची पाणीपुरवठा जलवाहिनीमार्फत ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा उद्या बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -