घरमुंबईआम्ही रक्त देतो, तुम्ही न्याय द्या

आम्ही रक्त देतो, तुम्ही न्याय द्या

Subscribe

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांना वसईकरांची रक्ताची भेट

अकरा कोटी रुपयांचा दफनभूमी घोटाळा करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा आरोप करून आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार्‍या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी वसईकर मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताची भेट पाठवणार आहेत.
वसईत 11 कोटी रुपयांचा दफनभूमी घोटाळा झाला. हा घोटाळा करणार्‍या महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी वसईकर अभियानामार्फत कित्येक दिवस धरणे, निदर्शने अशी आंदोलने करण्यात आली होती. तरीही घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे घोटाळेबाजांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांविरुद्ध मी वसईकर अभियानाने आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी जमावबंदीचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे प्रशासनातील लोकसेवक मालक बनल्याचा आरोप करीत मी वसईकर अभियानाने स्वातंत्र्यदिनी रक्त क्रांती अभियान हाती घेतले आहे. 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता वसईतील उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या प्रांगणात महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यविरांच्या प्रतिमेचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वसईकर आपले रक्त संकलीत करतील हे रक्त मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला रक्त देतो, तुम्ही आम्हाला न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. असे अभियानाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -