घरमुंबईजोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर अद्यावत क्रिकेट स्टेडियम उभारा - रविंद्र वायकर

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर अद्यावत क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

Subscribe

उदयोन्मुख क्रिकेट खेळाडुंसाठी जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर अद्यावत क्रिकेट स्टेडियम उभारा अशी मागणी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबई शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्याप्रमाणात क्रिकेट खेळण्यात येतो. परंतु खास करुन पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्यावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर अद्यावत क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार, उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

खेळासाठी भुखंड राखीव ठेवण्याची मागणी

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेट पटू राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात क्रिकेट या खेळाकरीता अद्यावत स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रिडा चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहिद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड अद्यावत क्रिकेट स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमुद केले आहे.

- Advertisement -

खेळाडुंसाठी क्रिकेट स्टेडियम उभारा

या ठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, यामुळे राज्याचे तसेच देशाचे देखिल नाव लौकीक वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे. देशासाठी भावी क्रिकेट पटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगिण विकासासाठी गुंतवणुक असणार असल्याचे मतही, वायकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

स्टेडियमसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद

उदयोन्मुख खेळाडुंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात रुपये ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही वायकर यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे.

- Advertisement -

वाचा – ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव’ यांच्या कलादालनासाठी ५ कोटींची मागणी

वाचा – सेल्फ फायनान्स कॉलेजांना लगाम लावा – राज्यमंत्री वायकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -