घरमुंबईविरारमध्ये नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

विरारमध्ये नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Subscribe

मृतदेहाची कोणतीही ओळख पटली नसून पोलिसांकडून याप्रकाराची तपासणी सुरू

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीतील खरड तारा ब्रीजजवळ एका झाडाखाली दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला असून मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून, तोंडाला चिकटटेप लावलेल्या अवस्थेत सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या मृतदेहाची कोणतीही ओळख पटली नसून पोलिसांकडून याप्रकाराची तपासणी सुरू आहे.

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत सापडलेल्या या महिलेच्या मृतदेहाचे वय साधारण ३५ ते ४० असावे, मृतदेहाच्या अवस्थेवरुन या महिलेवर अत्याचार करुन किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

महिलेच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेबाबत विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र या महिलेच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तिच्यावर अत्याचार करण्यात आला की नाही याचा तपास सुरू असल्याने नंतर याचे कारण उघड होईल, असे सांगितले जात आहे.


धक्कादायक! हातात शीर घेऊन गाठले पोलीस स्थानक आणि…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -