घरमुंबईहंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

Subscribe

दांड कातकरीवाडीचे हाल संपेनात

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील दांड कातकरीवाडी गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सेवांपासून वंचित आहे. वाडीतील महिलांना भर ऊन्हातून हंडाभर पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. पाण्याप्रमाणेच रस्ता, स्मशानभूमी यांचीही अवस्था शोचनीय असल्याने तेथील रहिवासांची गैरसोय होत आहे.

या वाडीत नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊनसुद्धा पाण्यासाठी वर्षानुवर्षे आदिवासी महिलांना भटकंती करावी लागत आहे. रखरखत्या ऊन्हात महिला, छोटी मुले डोंगर उतरून दूर अंतरावरील बोअरवेलचे पाणी आणतात. काहीवेळेला पुरुषांनाही अन्य कामे सोडून पाणी आणण्यासाठी डोंगराचा चढ-उतार करावा लागत असतो.

- Advertisement -

दरम्यान, गावाकडे जाणार्‍या रस्त्याचीही अक्षरशः दुर्दशा झाली आहे. गेले अनेक वर्षे हा रस्ता जैसे थे अवस्थेत असून खडीकरण व डांबरीकरण याचा रस्त्याशी कधीच संबंध आलेला नाही. माती आणि वर निघालेले दगड यामुळे त्यावरून चालणे जिकीरीचे होत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणे हे मोठे दिव्य ठरत असते. याशिवाय स्मशानभूमीचीही धडपणे व्यवस्था नसल्याने अंत्यविधीसाठी मोठीच अडचण होऊन बसते. वाडीबाहेर दगड रचून अंत्यविधी उरकावा लागतो. या वाडीची लोकसंंख्या 275 इतकी असून, जांभूळपाडा गावापासून हाकेच्या अंतरावर असणारी ही वाडी समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -