घरमुंबईस्वप्नांच्या पंखाला बळ देणारे एकमेव यांगपू-एज्यु क्लास- समीर कारखानीस

स्वप्नांच्या पंखाला बळ देणारे एकमेव यांगपू-एज्यु क्लास- समीर कारखानीस

Subscribe

जगातल्या सगळ्याचं महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उंच झेप घेण्याची इच्छा असते. आपापल्या आवडीच्या विषयात काहीतरी वेगळं करून बघावं असं त्यांना वाटत असतं. इतर हजारो विद्यार्थ्यांसारखं सामान्य पदवी मिळवून गप्प बसण्याकडे त्यांचा कल नसतो. त्यांना नवी नवी शैक्षणिक आव्हानं स्वीकारून ती यशस्वीपणे पार करण्याची, नवं ज्ञान आणि कौशल्य मिळवण्याची उर्मी असते. अर्थात हे सगळं करण्यामागे मुख्य विचार असतो तो सर्वोत्तम पगार देणारी नोकरी मिळवण्याचा. मात्र पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत काही ‘वेगळेपणा’च नसतो. समोर उत्तम पर्यायच नसतो. उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांमधूनच निवड करावी लागते. मात्र ‘उत्तम’ म्हणून निवडलेल्या या अभ्यासक्रमाला नोकरीच्या बाजारात एकतर फारशी किंमत तरी नसते किंवा आपण निवडलेला अभ्यासक्रम मार्केटच्या, एखाद्या व्यवसायाच्या दृष्टीने फारसा रेलेव्हंट राहिलेला नसतो.

तो विशिष्ट अभ्यासक्रम आपण शिकतो, पण त्या शिकण्यात ‘प्रॅक्टिकल एक्स्पिरिअन्स’नाव घेण्याएवढाही नसतो. आउटडेटेड, विद्यार्थांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि आवश्यक कौशल्यं न देणारे अभ्यासक्रम आणि पदव्यांची दैना विद्यार्थी जॉब मार्केटचे दरवाजे वाजवायला लागताच त्यांच्या लक्षात येते. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर
देशातल्या प्रत्येक राज्यातच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतल्या पदव्या ( यात पीएचडी केलेलेही आले ) घेतलेल्या बेकारांची संख्या अवाढव्य आहे.

- Advertisement -

निराशा, विमनस्कता आणि राक्षसी रिकामपण यांनी भारतीय पदवीधरांचा मनोव्यापार अत्यंत गुंतागुंतीचा झालेला आपण
पाहतोच आहोत. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक समर्थ, नव्या उर्जेने उभा राहिलेला प्रयत्न म्हणजेच ‘एज्युक्लास, सिंगापूर आणि यांगपू एज्युकेशन’यांनी संयुक्तपणे समोर आणलेला ‘अर्न व्हाईल यू लर्न’ (पढाई भी पगार भी ! ) हा अप्रतिम महत्वाचा पर्याय!

यांगपू एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन आणि एज्युक्लास सिंगापूर (EduCLaaS Singapore ) यांचं एकत्रित ध्येयच हे आहे की, पदव्युत्तर शिक्षण आणि नोकऱ्या यांच्यात एक घट्ट आणि आनंददायी संबंध निर्माण करणं. असा संबंध निर्माण करण्यासाठीच त्यांनी ‘अर्न व्हाईल यू लर्न’ हा पर्याय पुढे आणला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियरिंग आणि डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट यातले अत्याधुनिक कौशल्यांचं शिक्षण देणारे ‘ग्लोबल अॅप्रेंटीसशिप अभ्यासक्रम’त्यांनी निर्माण केले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रम हे नव्या युगातल्या उद्योग व्यवसायांसाठी—विशेषतः गिग इकॉनॉमीसाठी अत्यावश्यक असलेल्या कौशल्यांचं शिक्षण देण्यात अपयशी ठरल्यानंतरचं हे पाऊल अत्यंत नाविन्यपूर्ण आहे यात संशय नाही.

- Advertisement -

यांगपू एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन आणि एज्युक्लास सिंगापूरचे दोन पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स

1. ज्या विद्यार्थ्यांना फुल-स्टॅक डेव्हलपमेंट, AI आणि ML यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी Software
Engineering & Management हा अभ्यासक्रम निर्माण करण्यात आला आहे. इंजिनिअरींगमधले पदवीधर किंवा
डिप्लोमाधारक, B.Sc IT आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थी समूहाला या अभ्यासक्रमाचा फायदा होणार
आहे.

2. Digital Business and Management हा अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग आणि मार्केटिंग अॅनालिटिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अतिशय फलदायी आहे. कोणत्याही शाखेतला पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. हे दोन्ही प्रोग्राम्स कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, एकेकाळी नोकरी व्यवसायात असलेल्या, पण काही कारणांनी नोकरीत खंड पडून आता नव्याने नोकरी करू इच्छिणाऱ्या आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या स्त्रियांसाठी आणि मोठी झेप घेण्याची आकांक्षा असलेल्या व्यावसायिकांसाठी जणू काही वरदानच आहेत.

या दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शिक्षकांकडून सहा महिन्यांचं अत्यंत व्यापक आणि सखोल प्रशिक्षण प्राप्त होईल आणि नंतरचे अठरा महिने विद्यार्थ्याला ग्लोबली रेप्युटेड कंपनीत पगारी अॅप्रेंटीसशिप दिली जाईल. याचाच अर्थ असा की, नुसत्या बाता नाही, नुसतीच पोकळ थिअरी नाही, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवच विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. आज अत्यंत मोठी मागणी असलेल्या आणि नव्याने उदयाला येणाऱ्या फुल-स्टॅक डेव्हलपमेंट, आर्टिफ़िशीअल इंटलिजन्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण दिलं जाईल.

सिंगापूरच्या अत्यंत तंत्रज्ञान-समृद्ध वातावरणात वर मांडलेले दोन्ही प्रोग्राम्स डिझाईन करून विकसित करण्यात आले आहेत. आयव्ही लीग बी-स्कूल्सच्या माध्यमातून मॅनेजमेंटचं शिक्षण विद्यार्थ्यांना समृद्ध करणार आहे, त्यांच्या जाणीवा विकसित करणार आहे. या प्रोग्रॅम्सच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, शिक्षण आणि अठरा महिने मिळणारा कामाचा अनुभव तर मिळणार आहेच, पण त्यांना एक नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास गवसणार आहे. फिल्प्ड क्लासेस, व्हर्च्युअल, लाइव्ह इंटरअॅक्टिव्ह सेशन्स, ई-लर्निंग आणि व्यक्तीगत मार्गदर्शन यामुळे अवघ्या २४ महिन्यांच्या काळात यातला प्रत्येक विद्यार्थी आजचा उरलेला नसेल, त्याचं रुपांतर ‘परफेक्ट इंडस्ट्री-रेडी प्रोफेशनल’मध्ये झालेलं असणार आहे. वर्गात जे शिकलो ते थेट अप्लाय करून बघण्याची संधी त्याच्या अठरा महिन्याच्या अॅप्रेंटिसशिपच्या काळात मिळणार आहे हा या शिक्षणाचा सर्वांत मोठा विशेष आहे. लाँच होणाऱ्या या प्रत्यक्ष अनुभवकेंद्री कोर्सेसच्या अभ्यासक्रम आणि टिचिंग-लर्निंग प्रोसेसची रचनाच अशी करण्यात आली आहे की, विद्यार्थ्याने वर्गात मिळवलेल्या ज्ञानाचा वापर, त्या ज्ञानाची उपयुक्तता म्हणा किंवा परीक्षा म्हणा त्याला ज्या नामवंत कंपनीत काम करत असेल तिथे अगदी थेटपणे घेता येणार आहे. आणि या काळात त्याला पगारही मिळणार आहे. ‘शिकता शिकता कमवा आणि कमवता कमवता शिका’ असं म्हणण्यासारखीच ही प्रोसेस आहे.

या कोर्सेसच्या दोन वर्षांच्या काळातच विद्यार्थी अधिक एका दिशेने विकसित होणार आहेत. Ivy League Management Education च्या बिझनेस अॅनॅलिटिक, डिझाईन थिंकिंग अँड इनोव्हेशन, लीडरशिप या मॉड्युल्सचा लाभ त्यांना होणार आहे. या विद्यार्थ्यांना जगभरातील त्यांच्याचसारख्या समविचारी आणि समवयस्क व्यक्तींशी संवाद साधता
येणार आहे.

यांगपू एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन आणि एज्युक्लास सिंगापूर (Lithan eduCLaaS Singapore ) यांच्यातर्फे लॉन्च होत असलेल्या या कोर्सेसच्या पहिल्या बॅचचा प्रारंभ जानेवारी २०२२ मध्ये होतो आहे.

दोन्ही कोर्सेससाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. २४ महिन्यांच्या कोर्सची अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी, प्रवेशासाठी तुम्ही https://yangpoo.com/lithan/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. एज्युक्लास सिंगापूर ( Lithan eduCLaaS Singapore ) ही सिंगापूर मधली केवळ एक प्रशिक्षण संस्था आहे असं नसून तिचा दर्जा श्रेष्ठतम आहे. सिंगापूर सरकारच्या शिक्षण खात्यासह अनेक खासगी शिक्षण संस्थांनीही या प्रशिक्षण संस्थेला मान्यता दिली आहे. आशियातल्या १०० एज्युकेशन कॅम्पसेसशी जोडली गेलेली ही संस्था आहे. “आपण ज्या कोर्सेसची चर्चा इथे करतो आहोत त्यातला सगळ्यात आगळावेगळा भाग, ‘शिकता शिकता कमवा’ हा आहे. कोणत्याही लायक विद्यार्थ्याला केवळ त्याच्याकडे असलेला-नसलेला पैसा पाहून प्रवेश दिला वा नाकारला जाणार नाही. ज्या विद्यार्थ्याची एकरकमी फी भरण्याची क्षमता नसेल त्याला फी भरण्यासाठी अनेक इनोव्हेटिव पर्याय दिले जाणार आहेत. पैसा या निकषावर कोणालाही शिक्षण
नाकारलं जाऊ नये याबद्दल आम्ही ठाम आहोत!” अशी भूमिका डॉ. समीर कारखानीस (CEO of the global edtech company Yangpoo Executive Education.)यांनी स्पष्ट केलेलीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -