घरनवी मुंबईविकासाबरोबरच दर्जेदार शिक्षणावर भर देणार-डॉ.कैलास शिंदे

विकासाबरोबरच दर्जेदार शिक्षणावर भर देणार-डॉ.कैलास शिंदे

Subscribe

डॉ. कैलास शिंदे यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नवी मुंबई-: देशातील सर्वात मोठी गुंतवणुक ही शिक्षणावर केली जाते. भविष्याचे नागरिक घडवित असताना शिक्षण हा त्याचा पाया आहे. त्यामुळे शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.पालिकेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि परवडणारे शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचा मानस पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला. सिडकोच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्या बरोबरच शहराच्या विकासावर भर असेल, असेही डॉ.शिंदे यांनी स्पष्ट केले. ( Chartered Officer Dr. Kailas Shinde Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation)

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली झाल्यानंतर त्या जागी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणारे सनदी अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची शासनाने नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी (ता.२१) त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

- Advertisement -

पालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, अतिरिक्त अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुखांनी आयुक्तांचे स्वागत केले.

भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०१३ च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी डॉ.शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय व राज्यपाल सचिवालय येथे उपसचिव पदी काम केले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व ६८५ जिल्हयांमधून प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ जिल्हयाचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते स्विकारण्याचा बहुमान मिळविला आहे. स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत भारत सरकारमार्फत विशेष पुरस्काराचा मान लाभला.पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी तेथील आदिवासीबहुल भागात लोककल्याणकारी काम केले होते.तसेच कोव्हीड काळात व चक्रीवादळातही आपत्ती निवारणाचे महत्वपूर्ण कार्य केले.त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल राज्य व केंद्र सरकारमार्फत घेण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ.शिंदे यांनी महामुंबई, विमानतळ, गोल्फ कोर्स, निर्मितीत महत्वपूर्ण कार्य करण्यासोबतच वसाहत व पणन, सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा तसेच इर्शाळवाडी पुनर्वसन कार्यातही भरीव कामगिरी केलेली आहे. शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन सेवेवर त्यांनी भर दिला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाच्या कामाची माहिती घेतली व विभागनिहाय कामकाजाचा स्वतंत्र आढावा व क्षेत्रभेटींचे नियोजन केले.

  •  भाजपा नेत्यांनी घेतली आयुक्त डॉ.शिंदेंची भेट
    नवी मुंबई-ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांनी त्याच प्रमाणे भाजपाचे ऐरोली मंडल तालुकाध्यक्ष व प्रभाग-१५ चे माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी नवंनिर्वाचित पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -