Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई धक्कादायक! मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर

धक्कादायक! मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर

खारघर येथील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कार्यकरत असलेल्या बोगस डॉक्टरचा पडदा फाश करून खारघर पोलिसांनी सदर बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या.

Related Story

- Advertisement -

खारघर येथील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कार्यकरत असलेल्या बोगस डॉक्टरचा पडदा फाश करून खारघर पोलिसांनी सदर बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या. रोहित यादव असे आरोपीचे नाव आहे. खारघर डी मार्ट जवळ सेक्टर १५ येथील खारघर मल्टीस्पेशालिटी याठिकाणी बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हे पेशंट्स तपासणी करीत असल्याची माहिती खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे डॉक्टर यांना बोलवून सदर हाॅस्पीटल येथे बनावट पेशंट्स ला पाठविण्यात आले.

त्याला कुठलाही आजार नसताना तेथे असलेल्या बनावट डॉक्टर ने त्याच्या खाली असलेल्या मेडिकल स्टोअर मधुन औषधी आणायला सांगून १००० रूपये चेकअप फि घेतली. त्यानंतर खारघर पोलिसांनी हाॅस्पिटल येथे छापा मारून बनावट बोगस डॉक्टर आरोपी नामे रोहित गुप्तेश्वर यादव (वय २७) वर्ष यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी केली. त्याने गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द येथे कंपाऊंडर चे काम केले असून येथे तो आरएमओ म्हणून पेशंट्स तपासात असल्याचे निष्पन्न झाले त्यास सहपोनि पाटील यांनी अटक केली. कोर्टाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवले आहे या बोगस डॉक्टरने किती पेशंट्स तपासुन चुकीचे औषधोपचार केले असतील त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला तर करोनाच्या नावाखाली पेशंट्स दगावले असे सांगून खारघरवासीची लुट फसवणूक खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल डी मार्ट जवळ से १५ या हाॅस्पिटल कडून झाली. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी खारघर रहिवाशांकडून होत असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी बोगस डॉक्टर ला पकडुन लोकांचे जीव वाचवले, याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा पोलीस उपायुक्त झोन १ पाटील सो व वपोनि शत्रुघ्न माळी यांचे मार्गदर्शनानुसार एपीआय पाटील हे करत आहेत.

हेही वाचा –

- Advertisement -

उद्धव ठाकरेंची परदेशात अवैध मालमत्तेसह काळा पैसा, यादीसह पुरावे ईडीला देणार – रवी राणा

- Advertisement -