घरनवी मुंबईऐरोलीत स्वच्छता योध्दांचा सन्मान; स्वच्छता कामगारांना सुट्टी देत ‘ड्रीम ऐरोली’ उपक्रम

ऐरोलीत स्वच्छता योध्दांचा सन्मान; स्वच्छता कामगारांना सुट्टी देत ‘ड्रीम ऐरोली’ उपक्रम

Subscribe

आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी सरकार आणि महापालिकेच्या यंत्रणेनचे उपाययोजना करायला हवी आणि नागरिक काहीच करुन शकत नाही अशी मनोवृत्ती का बाळगायची. त्या ऐवजी आपणच एकत्र येऊन प्रयत्न करण्यास हरकत काय आहे, असा निर्धार करत ऐरोलीमधील नागरिकांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने ड्रीम ऐरोली हा उपक्रम सुरु केला आहे. ऐरोलीत सेवा देणार्‍या पालिकेच्या ३५० स्वच्छताकर्मींना शनिवारी एक दिवसाची सुट्टी देत अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. पालिकेच्या स्वच्छता योध्दांना मॅडेल देऊन सन्मानित करण्यात आले.

नवी मुंबई: आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी सरकार आणि महापालिकेच्या यंत्रणेनचे उपाययोजना करायला हवी आणि नागरिक काहीच करुन शकत नाही अशी मनोवृत्ती का बाळगायची. त्या ऐवजी आपणच एकत्र येऊन प्रयत्न करण्यास हरकत काय आहे, असा निर्धार करत ऐरोलीमधील नागरिकांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने ड्रीम ऐरोली हा उपक्रम सुरु केला आहे. ऐरोलीत सेवा देणार्‍या पालिकेच्या ३५० स्वच्छताकर्मींना शनिवारी एक दिवसाची सुट्टी देत अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. पालिकेच्या स्वच्छता योध्दांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या निमित्ताने ऐरोली सेक्टर-६ येथील काचेच्या शाळेपासून १०० हून अधिक विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली तसेच सेक्टर-५ येथील सरस्वती विद्यालय, सेक्टर-१५ येथील महापालिकेच्या शाळेने रॅली काढली होती. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ.बाबासाहेब राजळे व परिमंडळ २ चे उपआयुक्त अमरीश पटनिगिरी यांच्या मार्गदर्शन खाली या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ऐरोली विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांनी सुयोग्य नियोजन केले होते. मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे तसेच उप मुख्य स्वछता आधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता अधिकारी सुभाष म्हसे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता बंधू शिरोसे, संतोष शिंतोडे, अविनाश जाधव, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले, विजेंद्र जाधव, नरेंद्र विचारे, निलेश पवार, मनीष सरकटे, भरत डोंगरे, गणेश राऊत यांनी सर्व सहकारी तसेच स्वच्छता कामातील पर्यवेक्षक यांना एकत्र घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -