मुंबईवर हल्ल्याची धमकी ट्विटरवरून; २६/११ ची पुनरावृत्ती

शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या ट्विटर टीमला धमकीचे ट्विट दिसले. @indianslumdog ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट आले होते. या ट्विटमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या २६/११ चित्रपटाचे पोस्टर वापरण्यात आले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होईल, असे या ट्विटमध्ये लिहिले होते. सुरुवातीला या ट्विटला कोणी गांभीर्याने घेतले नाही. कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही.

मुंबईः मुंबईवर अतिरेकी हल्ल्याची धमकी पुन्हा मिळाली आहे. या धमकीत २६/११ ची पुनरावृत्ती होईल, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र ही धमकी फोन किंवा ई-मेलवरून मिळालेली नाही. तर ट्विट करुन ही धमकी देण्यात आली आहे.

शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या ट्विटर टीमला धमकीचे ट्विट दिसले. @indianslumdog ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट आले होते. या ट्विटमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या २६/११ चित्रपटाचे पोस्टर वापरण्यात आले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होईल, असे या ट्विटमध्ये लिहिले होते. सुरुवातीला या ट्विटला कोणी गांभीर्याने घेतले नाही. कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही.

मात्र या ट्विटला टॅग करुन @ghantekaking नावाने दुसरे ट्विट करण्यात आले होते. @indianslumdog हा गुजरातच्या सुरतमधील आहे. तो २६/११ हल्ल्याची चेष्टा करत आहे. त्याला असं वाटतंय की असा हल्ला पुन्हा मुंबईवर व्हावा. त्यामुळे त्याची तत्काळ चौकशी करायला हवी, असे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते. मुबईला अतिरेकी हल्ल्याची धमकी देणारे ट्विट कोण हाताळत आहे याची माहिती माझ्याकडे आहे, असेही @ghantekaking च्या ट्विटमध्ये म्हटले होते. ह्या ट्विटनंतर लगेचच मुंबई पोलीस सर्तक झाले. त्यांनी तत्काळ हे ट्विट करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

@indianslumdog नावाने नेमके कोणी ट्विट केले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी @ghantekaking ट्विटर हॅण्डलरकडे मुंबई पोलिसांनी मदतही मागितली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीनेदेखील याचा तपास सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.