घरनवी मुंबईनमुंमपाची डिसेंबर अखेर ३९६ कोटी ७० लाखांची मालमत्ताकर वसुली

नमुंमपाची डिसेंबर अखेर ३९६ कोटी ७० लाखांची मालमत्ताकर वसुली

Subscribe

नवी मुंबई, ज्ञानेश्वर जाधव
नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीत मागील वर्षी उद्दिष्ट पुर्तता करण्यात यश मिळविले होते. यंदाही पालिकेने नियोजना नुसार कर वसुली ध्येय पुर्ती वाटचाल सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे. पालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत ३९६ कोटी ७० लाख ४ हजार ८५२ कोटींची वसुली केली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation recovered 396 crores 70 lakhs 4 thousand 852 crores) पालिकेने ८०० कोटीं कर वसुलीचे उद्दिष्टय डोळया समोर ठेवले असून यंदा पालिका कोटींची झेप घेण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आर्थिक राजधानी मुंबईच्या सीमेवर वसलेली, नवी मुंबई ही एक मोठी महानगरपालिका आहे. या पालिका क्षेत्रा अंतर्गत ऐरोली, बेलापूर, दहिसर मोरी, दिघा, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भे आणि वाशी अशा नऊ नोडचा समावेश आहे. पालिका अंतर्गत नोंदणीकृत ३ लाख २९ हजार २९६ लाख मालमत्ता आहेत. यापैकी २ लाख ६३ हजार ०९७ निवासी मालमत्ता आहेत, तर ६० हजार ८५ अनिवासी मालमत्ता आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ६ हजार ११४ संस्थांकडून पालिकेला मालमत्ता कर मिळतो. त्यामुळे मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो.

- Advertisement -

घर पट्टी आणि पाणी पट्टी वसुलीसाठी पालिकेने मागील वर्षभरात विविध योजना राबविल्या आहेत. मोठ्या सोसायट्या, इमारतींमधील रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिकेने वारंवार कळवूनही मालमत्ता कर भरलेला नाही. त्यानुसार मालमत्ता कर वसुलीवर भर देत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या निर्देशनुसार विभागांमध्ये जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे.

विभागवार वसुली (डिसेंबर २०२३ अखेर)
ऐरोली विभाग-:     ४६ कोटी ०२ लाख ८२ हजार ०९४
वाशी विभाग-:      ३२ कोटी ६० लाख ७२ हजार ०१५
नेरुळ-:              ७५ कोटी ०२ लाख ९२ हजार ८५२
दिघा-:               १२ कोटी ८७ लाख ६१ हजार २०२
कोपरखैरणे-:       ७१ कोटी ९२ लाख ९९ हजार १८४
बेलापूर-:            ४३ कोटी ५५ लाख २२ हजार ४३१
तुर्भे-:                ६८ कोटी ५० लाख ६९ हजार ७५२
घणसोली-:          ४६ कोटी १७ लाख ५ हजार ३२१
एकुण वसुली-:३९६ कोटी ७० लाख ४ हजार ६५२

  1. ५०० चौरस फुटांवर अद्याप निर्णय नाही
    मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी करण्यासाठी पालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय झाला तर या भागात ५०० चौरस फुटांच्या मालमत्ताधारकांना याचा लाभ मिळणार आहे. नवी मुंबईला ५०० चौरस मीटर घंराच्या करांना कर माफीचा निर्णय झाल्यास पालिकेला ३० कोटी चा आर्थिक फटका बसू शकतो.
  2. लिडार सर्वेक्षण अंतिम टप्पयात
    नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील सर्व मालमत्तांची लाइट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग टेक्नॉलॉजी अर्थात लिडार सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून लिडार सर्वेक्षणांचे काम पालिकेने कंपनीला दिले होते. या कंपनीने ३ लाख ९ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. त्यामुळे अर्थ संकल्पात ८०० कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -