घरनवी मुंबईसिडकोतर्फे सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मान

सिडकोतर्फे सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मान

Subscribe

आपले मनोगत व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सावित्रीमाई फुले यांचे कार्य केवळ स्त्री शिक्षणापुरते मर्यादित नसून समाज सुधारणेसाठी त्यांनी दिलेले योगदानही तितकेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन केले.

नवी मुंबई-: सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती सोहळा सिडको भवन येथे संपन्न झाला.सावित्रीमाई फुले जयंतीच्या निमित्ताने सिडको महामंडळातील व महामंडळाबाहेरील कर्तृत्वान महिलांमध्ये अस्मिता दळवी (माजी प्रभारी मुख्य लेखाधिकारी,सिडको),अलिशा पटेल (नवी मुंबई प्रकल्पग्रस्त महिला वैमानिक) आणि माधुरी माणिककुवर (कनिष्ठ अर्थशास्त्रज्ञ,सिडको) यांना सावित्रीच्या लेकी या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Kranti Jyoti Savitrimai Phule Jayanti Celebration CIDCO Bhavan)

या कार्यक्रमाला परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते रविंद्र पोखरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सावित्रीमाई फुलेंच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

या प्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, फैय्याज खान (महाव्यवस्थापक, कार्मिक), अमिता पौनीकर (कंपनी सचिव, सिडको) या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस जे.टी.पाटील, नरेंद्र हिरे (अध्यक्ष, सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशन), नितिन कांबळे (सरचिटणीस) त्याच प्रमाणे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -