घरनवी मुंबईSharad Pawar & Monsoon : शरद पवार अन् पावसाचं समीकरण; साताऱ्यानंतर नवी...

Sharad Pawar & Monsoon : शरद पवार अन् पावसाचं समीकरण; साताऱ्यानंतर नवी मुंबईतही पावसात सभा

Subscribe

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेनंतर विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीचं चित्र पालटल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यानंतर आता नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली आणि या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा भर पावसात सभेला संबोधित केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शरद पवार आणि पावसाचं समीकरण आहे, असेच म्हणावे लागेल. (Sharad Pawar & Monsoon Equation of Sharad Pawar and rain After Satara meeting in Navi Mumbai also in rain)

हेही वाचा – Telangana Assembly Election : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील 4 हजार नागरिक करणार तेलंगणात मतदान

- Advertisement -

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शरद पवार यांनी हजेरी लावली. पंरतु जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे स्वागत समारंभ थांबवून शरद पवार यांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती केली. यावेळी भरपावसात भाषण करताना शरद पवार म्हणाले की, आज अनेक महिलांनी अनेक चांगले स्टॉल उभे केले, मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली आहे. परंतु निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये, हे माझं सांगणं आहे. त्यामुळे निराशेवर मात करताना संघर्ष आणि धैर्याने पुढे जाऊ, हा निर्धार आज आपण करुया, असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थित महिलांना दिला.

हेही वाचा – OBC Reservation : छगन भुजबळांनी शरद पवार यांचे मानले आभार; पण का?

- Advertisement -

भर पावसातील भाषणामुळे साताऱ्यांच्या सभेची झाली आठवण 

उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. यामुळे पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील हे होते. जे शरद पवार यांचे मित्र आणि त्यांच्या राजकारणातील सुरूवातीपासूनचे सोबती होते. त्यांच्यासाठी शरद पवारांनी भर पावसात सभेला संबोधित केले. त्यांनी पावसाचा विचार न करता भाषण केले आणि सभा गाजवली होती. त्यामुळे शरद पवार यांचे भर पावसात भिजणारे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. शरद पवारांच्या भाषणामुळे निवडणुकीचा निकालही श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -