घरनवी मुंबईनमुंमपातील १२० अधिकार्‍यांच्या बदल्या; निवडणुकीच्या तोंडावर रंगली चर्चा

नमुंमपातील १२० अधिकार्‍यांच्या बदल्या; निवडणुकीच्या तोंडावर रंगली चर्चा

Subscribe

दंतचिकित्सक डॉ.गडदे यांच्याकडे अतिक्रमणाचा भार;चार मुख्य स्वच्छता अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कारभार

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आदेशान्वये पालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पालिकेतील एकूण १२० अधिकारी वर्गांच्या आयुक्त नार्वेकर यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. ( Commissioner Narvekar ordered transfers of a total of 120 officer classes in the Navi mumbai municipality) तर काही अधिकार्‍यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात स्थगित केलेल्या बदल्यांचाही समावेश आहे. मागील अनेक काही महिन्यांपुर्वी पालिका आयुक्त नार्वेकरांकडे बदलच्यांचे अर्ज आले होते.अनेकांनी आपल्याला मनाजोगे बदलीचे ठिकाण मिळावे यासाठी डाव टाकले होते. आगामी निवडणुका लक्षात घेता या मनाजोगे बदली झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आणि राजकीय नेत्यांच्या कार्यालयात रंगल्या होत्या.

पालिका आयुक्त नार्वेकर यांनी केलेल्या बदलीमध्ये उपअभियंता स्थापत्य ऐरोली विभागात कार्यरत असणारे संतोष शिकतोडे यांची बदली कोपरखैरणेत तर सार्वजनिक बांधकाम विभागातील गजानन पुरी यांची ऐरोलीत उप अभियंता म्हणून वर्णी लागले आहे. उपअभियंता स्थापत्य विभागातील दीपक नगराळे, पंढरीनाथ चवडे, कल्याण कुलकर्णी यांची बदली करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (करार) यांची तात्पुरत्या स्वरूपामध्ये पदभार देण्यात आला असून ऐरोलीतील रोहित पिंगळे यांच्याकडे वाशी विभाग, नानिक मनसुखानी सार्वजनिक बांधकाम विभाग अमृत योजना मुख्यालय येथून तुर्भे विभागात पाठवण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य यातील वैभव भाये, मीनल उत्तम अहिरे यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

वैद्यकीय विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास भालेकर, डॉक्टर मनीषा शिंदे (बालरोगतज्ञ), डॉक्टर वैशाली गुप्ते (बधिरीकरण तज्ञ) यांच्याकडे निवासी वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.
वैद्यकीय अधीक्षकांमध्ये ऐरोली माता बाल रुग्णालयातील डॉ.वर्षा राठोड यांची बदली माता बाल रुग्णालय-बेलापूर तर डॉ.रवींद्र म्हात्रे यांच्याकडे बेलापूर ऐवजी ऐरोलीचा कार्यभार देण्यात आला आहे. डॉ.अमोल देशमुख (बालरोगतज्ञ) यांची कोपरखैरणे माता बाल रुग्णालयातून वाशी रुग्णालयात बदली झाली आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत जावडेकर यांची घनकचरा व्यवस्थापन तर शासनाकडून आलेल्या ऋतुजा गवळी यांच्याकडे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
पालिकेच्या सेवेत सफाई कामगार या सह वर्गातील कर्मचार्‍यांची पदस्थापना करण्यात आली असून विविध विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत असणारे या सेवेतील १८ कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे.
पालिकेत स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील कर्मचारी अधिकार्‍यांची बदली करण्यात आली असून १४ स्वच्छता निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

तुर्भे विभागात कार्यरत असणारे रुपेश पाटील यांच्याकडे दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र वाशी याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पालिकेत करार पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत २३ कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय समाजसेवक शाखा अभियंता विद्युत विभाग या ठिकाणच्या अधिकार्‍यांच्या देखील बदल्या पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केल्या आहेत.

दंतचिकित्सक डॉ.गडदे यांच्याकडे अतिक्रमणाचा भार
वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉ.अजय गडदे यांच्याकडे सध्या असलेला सार्वजनिक रुग्णालय वाशी कोविड संपूर्ण कामकाज नियंत्रित करणेच्या कारभारा बरोबर अतिक्रमण विभाग (मुख्यालय) सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पालिकेत अतिक्रमण विभागात येण्यासाठी चढाओढ सुरू असताना गडदे यांची वर्णी लागल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

चार मुख्य स्वच्छता अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कारभार
पालिकेच्या सेवेतील मुख्य स्वच्छता अधिकारी जुईकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी दिघा विभागातील सतीश सनदी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. परवान विभागातील ( पशुवैद्यकीय सेवा) संजीव शेकडे यांचे परिमंडळ एक मध्ये उपमुख्य स्वच्छता अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. राजेंद्र इंगळे जी-ऐरोली विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी यांच्याकडे परिमंडळ-२ चा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे विश्वनाथ पडघन यांच्याकडे घणसोली सह दिघा एच विभागाचा उच्च स्वच्छता अधिकारी पदाचा पदावर देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -