घरपालघरमहामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Subscribe

दिवित शेठ(२५) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

विरार :  मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा उड्डाणपुलावर तांत्रिक बिघाड झाल्याने भर रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीची धडक लागून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवित शेठ(२५) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात या भागांना जोडणारा मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. भारताचा सुवर्ण चतुष्टकोन म्हणून गणल्या जाणार्‍या या मार्गावरून हलक्या जड अवजड अशा वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु अनेक वेळा मार्गावर विविध ठिकाणच्या भागात वाहने तांत्रिक बिघाड होऊन रस्त्याच्या मध्येच बंद पडतात. ही बंद पडलेली वाहने वेळीच न हटविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. महामार्गावरील विरारफाटा उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसात बंद अवस्थेत पडलेल्या वाहनांमुळे अपघात झाल्याची ही तिसरी घटना आहे.
मुंब-ई अहमदाबाद महामार्गावर विरार फाटा उड्डाणपुलावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास लोखंडाने भरलेला ट्रेलर क्रमांक एमएच ४६ बी ७७७ हा तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या अनेक तासापासून भर रस्त्यात तिसर्‍या लेनमध्ये उभा होता.
हे वाहन वेळीच रस्त्यामधून बाजूला करणे गरजेचे होते, परंतु वाहन बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने कोणतीच यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने वाहन भरस्त्यात उभे असल्याने मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी मोटरसायकल या ट्रेलरला धडकली व या दुचाकीवरील वाहन चालक दूरवर जाऊन फेकल्याने गंभीर दुखापत होऊन दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -