घरपालघरअरबी समुद्रात मासेमारी बोटीला अनोळखी मालवाहू जहाजाची धडक

अरबी समुद्रात मासेमारी बोटीला अनोळखी मालवाहू जहाजाची धडक

Subscribe

अचानक गुजरात बाजूकडे जाणार्‍या एका भल्या मोठ्या मालवाहतूक करणार्‍या जहाजाने, पाठीमागून जोरदार धडक दिली. पंख्या जवळ भगदाड पडल्याने बोटीत पाणी घुसू लागले.

डहाणू : डहाणू अरबी समुद्रात धाकटी डहाणू येथील सागर सरिता नावाच्या मासेमारी बोटीला,रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात,एका भल्या मोठ्या अनोळखी मालवाहू जहाजाने पाठीमागून धडक दिली.त्यानंतर बोटीसह अज्ञात पळून गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. शनिवारी धाकटीडहाणू येथील वत्सला यशवंत मर्दे यांची,सागर सरिता नावाची मासेमारी बोट रात्री आठ वाजताच्या सुमारास,खोल समुद्रात जाळी टाकून मासेमारी करीत असताना, तिला अचानक गुजरात बाजूकडे जाणार्‍या एका भल्या मोठ्या मालवाहतूक करणार्‍या जहाजाने, पाठीमागून जोरदार धडक दिली. पंख्या जवळ भगदाड पडल्याने बोटीत पाणी घुसू लागले.

बोटीत असणार्‍या नऊ खलाशांनी प्रसंगवधान राखून, भगदाड पडलेल्या जागी चादरी घालून पाणी अडविले, आणि जवळच मासेमारी करीत असलेल्या बोटीना पाचरण केले. त्यांनी रात्री एक वाजताच्या सुमारास,या अपघातग्रस्त मासेमारी बोटीला,डहाणू किनार्‍यावर आणले. या घटनेमुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करायची की नाही,असा सवाल मच्छीमार नेते अशोक अंभिरे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -