घरपालघरमहानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम वातानुकूलित शौचालयाचे लोकार्पण

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम वातानुकूलित शौचालयाचे लोकार्पण

Subscribe

हे पहिले वातानुकूलित शौचालय स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आले आहे. शौचालय वापरणार्‍यांकडून शौचालयासाठी प्रत्येकी २ रुपये तर अंघोळीसाठी प्रत्येकी ५ रुपये आकारण्यात येणार आहे.

भाईंदर :- काशिमीरा उड्डाणपुलाखाली राबडीया सेवक संघ या संस्थेच्या सी.एस.आर. फंडातून उभारण्यात आलेल्या शहरातील प्रथम वातानुकूलित शौचालयाचे उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते व आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी शहर अभियंता दिपक खांबीत, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, उप-शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक व राबडीया संघ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.पैसे द्या, वापरा तत्वावर पालिकेकडून शहरात प्रथमच बांधा, वापरा व हस्तांतर करा (बीओटी) धोरणानुसार वातानुकूलित शौचालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पहिले वातानुकूलित शौचालय स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आले आहे. शौचालय वापरणार्‍यांकडून शौचालयासाठी प्रत्येकी २ रुपये तर अंघोळीसाठी प्रत्येकी ५ रुपये आकारण्यात येणार आहे. पण मुतारीचा मोफत वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये इंडियन तसेच इंग्लिश टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने पहिल्यांदाच पंचतारांकित वातानुकूलित शौचालय बांधले असून त्याचे लोकार्पण १ नोव्हेंबर रोजी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते व आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -