घरपालघर...तरच टोल आकारणी बंद करण्यात येईल

…तरच टोल आकारणी बंद करण्यात येईल

Subscribe

एकूणच खासदार गावित यांच्या शब्दांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने किंमत दिली नसून, त्यांनी टोल वसुली सुरू ठेऊन एकप्रकारे रस्त्याची पाहणी करणार्‍या राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना गृहीत धरल्याचे दिसून येत आहे.

डहाणू : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. बुधवारी 14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, खासदार राजेंद्र गावित, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महामार्ग पोलीस निरीक्षक मृदुला नाईक व संबंधित अधिकारी यांनी संयुक्तपणे महामार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासमोर महामार्गावरील खड्डे बुजवून महामार्ग पूर्ववत करेपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे तोंडी निर्देश महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिले. मात्र,खासदार राजेंद्र गवितांच्या शब्दांना राष्ट्रीय प्राधिकरण अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी गावित यांनी टोल नाका बंद करत हे निर्देश देऊन सुध्दा टोल नाके सुरू असून टोल आकारणी देखील सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ह्याबाबत टोलवरील अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल बंद करायचा की नाही ह्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर सूरज सिंह हे निर्णय घेतील व त्यांनी तसे निर्देश दिल्यास टोल आकारणी बंद करण्यात येईल. एकूणच खासदार गावित यांच्या शब्दांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने किंमत दिली नसून, त्यांनी टोल वसुली सुरू ठेऊन एकप्रकारे रस्त्याची पाहणी करणार्‍या राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना गृहीत धरल्याचे दिसून येत आहे.

फॉरेन्सिक टीमला पाचारण

- Advertisement -

सायरस मिस्त्री यांच्या वाहनाचा अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने चौकशी अंती दिलेल्या अहवालानुसार महामार्गावरील रस्त्यांच्या तांत्रिक त्रुटीमुळेच मिस्त्रींच्या वाहनाचा अपघात झाल्याचे समोर आले. त्यानंतर महामार्ग आणि जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले असून, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी ह्याबाबत रस्ते सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन.एच. ए.आई) यांची तातडीची बैठक घेऊन महामार्गावरील समस्यांची चर्चा केली. दरम्यान त्यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मोठ्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. हा दौरा घोडबंदरपासून तलासरीपर्यंत आखण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पाहणी दौरा चारोटी येथील सायरस मिस्त्री यांच्या अपघातस्थळी येऊन थांबला असून, तिथेच दौरा संपविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -