घर पालघर पतीचा खून करून अपघाताचा बनाव केला, पोलिसी हिसक्यानंतर प्रकार उघडकीस आला

पतीचा खून करून अपघाताचा बनाव केला, पोलिसी हिसक्यानंतर प्रकार उघडकीस आला

Subscribe

पतीचा नेमका अपघात कुठे आणि कसा झाला याचीही माहिती देत असताना ती काहीतरी लपवालपवी करत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यावर मन्सुराने खरी हकीकत कथन केल्यावर हत्येचा उलगडा झाला.

वसईः प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची आपल्या प्रियकर आणि त्याच्या सहा साथिदारांसह हत्या करून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र, याप्रकरणात संशय आल्याने कसून तपास केल्यावर खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.२१ ऑगस्टला नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या रियाज अली (५५) अपघातात जखमी झाल्याने पत्नी मन्सुरा(३५) हिने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथे रियाज अली यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीस चौकशीत मन्सुरा चुकीची माहिती देत होती. पतीचा नेमका अपघात कुठे आणि कसा झाला याचीही माहिती देत असताना ती काहीतरी लपवालपवी करत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यावर मन्सुराने खरी हकीकत कथन केल्यावर हत्येचा उलगडा झाला.

नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग येथे रिजाय अली आपली पत्नी मन्सुरा आणि दोन मुलांसह रहात होते. मन्सुरा नालासोपारा येथील गणेश पंडित यांच्या किराणा माल विक्रीच्या दुकानात काम करत होती. त्याठिकाणी दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. ही माहिती रियाजला समजताच घरात वाद होऊ लागले. पतीच्या छळाला कंटाळलेल्या मन्सुराने गणेश पंडितला याची माहिती दिली. तेव्हा प्रेमात अडथळा ठरत असलेल्या रियाजचा काटा काढण्याचा प्लान मन्सुरा आणि गणेशने बनवला होता. २१ ऑगस्टला मन्सुरा आणि गणेशने कळंब समुद्रकिनारी फिरायला जायचे सांगून रियाजला सोबत घेतले. रियाजला काटा काढायचा असल्याने सोबत गणेशने आणखी सहा जणांना घेतले होते. संध्याकाळी संधी साधून य ाटोळक्याने रियाजची हत्या केली. त्यानंतर रियाजचा अपघात झाल्याची बतावणी करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण, पोलीस चौकशीत त्यांचा बनाव उघडकीस आला. हत्येचा कट पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आल्याने गुन्हा पेल्हार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेश आणि मन्सुराला अटक केली असून त्यांच्या सहा साथिदारांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -