घरपालघरदिल्लीच्या ठगाने केली ९७ लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल

दिल्लीच्या ठगाने केली ९७ लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल

Subscribe

वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरून आपल्या दिव्यांग मुलीचे दिल्लीतील एका इसमाशी लग्न लावून देणे भाईंदरमधील मराठी कुटुंबाला चांगलेच महागात पडले.

वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरून आपल्या दिव्यांग मुलीचे दिल्लीतील एका इसमाशी लग्न लावून देणे भाईंदरमधील मराठी कुटुंबाला चांगलेच महागात पडले. दिल्लीच्या ठगाने लग्न केल्यानंतर रोख रक्कम आणि दागिने मिळून ९७ लाख रुपये लाटले आणि मुलीला सोडून पळ काढल्याची घटना उजेडात आली आहे. मिरा रोड येथील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सुरेश भांडारकर यांना आपल्या ३९ वर्षीय दिव्यांग मुलीच्या लग्नाची काळजी होती. एका इंग्रजी दैनिकात आलेल्या जाहिरातीवरून त्यांनी कुटुंबाशी सल्ला-मसलत करून दिल्लीतील अजय अग्रवाल याच्याशी मीरा रोड येथील घरी १ मार्च २०१९ रोजी लग्न लावून दिले होते. दिल्लीत बांधकाम व्यवसाय असल्याची बतावणी करणारा अजय महिन्यातील आठ दिवस मीरा रोडला सासरीच रहायला येत होता. घरच्यांशी पटत नसल्याने वेगळा रहात असल्याचेही कारण तो देत होता.

गेल्यावर्षी त्याने लखनऊला पाच खोल्यांचा फ्लॅट विकत घेण्याची गळ सुरेश भांडारकरांना घातली. मुलीसाठी त्यांनी स्वतःचा फ्लॅट विकून अजयला ८२ लाख रुपये दिले. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी अजय भावाचे दिल्लीत लग्न असल्याचे कारण सांगून मुलीला दिल्लीला घेऊन गेला होता. जाताना लग्नात घालण्यासाठी मुलीला सोनेही घ्यायला सांगितले. त्यानुसार मुलगी १५ लाखांचे दागिने घेऊन सोबत गेली होती. २२ फेब्रुवारीला सर्व दागिने स्वतःकडे ठेऊन अजयने पुढच्या डब्यात असल्याचे सांगून मुलीला राजधानी एक्सप्रेसने बोरीवलीला पाठवून दिले. त्यानंतर मुलगी मीरा रोड येथील घरी परतली. मुलगी घरी आल्यावर अजयला वारंवार फोन करून कधी येणार अशी विचारणा सुरेश भांडारकर करत होते. अजय दरवेळी वेगवेगळ्या तारखा देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सविता सुरेश भांडारकर यांनी तक्रार दिल्यानंतर नयानगर पोलिसांनी अजय अग्रवाल विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

हेही वाचा –

युक्रेन आता नाटोच्या सदस्यत्वाासाठी आग्रह धरणार नाही, युद्धाला पूर्णविराम ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -