Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी १०० रुग्ण कोरोनामुक्त तर ५४ बाधितांची नोंद

मुंबईचा मृत्यूदर हा शून्यावर असून आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईच नाही राज्यातही मागील दोन दिवसात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Mumbai Corona Update 54 corona pasitive patients registared 100 corona free in last 24 hours
Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी १०० रुग्ण कोरोनामुक्त तर ५४ बाधितांची नोंद

मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आज वाढली आहे. मागील २४ तासात राज्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल हिच संख्या ७७ इतकी होती. तर मुंबई आतापर्यंतच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १ लाख ३७ हजार ७४ इतकी आहे.

मुंबईतील आजच्या बाधित रुग्णांची संख्या देखील मंगळवार पेक्षा ६ने कमी झाली आहे. मागील २४ तासात ५४ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत आतापर्यंत १ लाख ५७ हजार ७० बाधित रुग्ण आढळले आहेत. आज संपूर्ण दिवसभरात मुंबईत १४ हजार ७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. त्यातील ५४ पॉझिटिव्ह आल्या असून बाधितांपैकी ११ रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. तर ३ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली.

मुंबईचा मृत्यूदर हा शून्यावर असून आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईच नाही राज्यातही मागील दोन दिवसात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. २ मार्च ते १८ मार्च पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.०१ टक्के इतका असून रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे.

राज्याचा विचार केला असता राज्यात मागील २४ तासात ३५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज एकही मृत्यू झालेला नाही. तसेच आज ५५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ३५९ नव्या रुग्णांची वाढ; मार्च महिन्यात तिसऱ्यांदा आज एकही मृत्यूची नोंद नाही