घरपालघरनोंदणीअभावी सक्शन कम जेटींग मशीन उभ्या; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

नोंदणीअभावी सक्शन कम जेटींग मशीन उभ्या; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

Subscribe

महापालिकेने खरेदी केलेल्या सहा अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन परिवहन विभागाच्या नोंदणीअभावी उभ्या करून ठेवण्याची नामुश्की महापालिकेच्या आरोग्य विभागावर ओढ़वली आहे

सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरिता व शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करण्याकामी मोठा गाजावाजा करत महापालिकेने खरेदी केलेल्या सहा अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन परिवहन विभागाच्या नोंदणीअभावी उभ्या करून ठेवण्याची नामुश्की महापालिकेच्या आरोग्य विभागावर ओढ़वली आहे. वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (आरोग्य) निलेश जाधव यांनी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना नोंदणी झाल्याशिवाय ‘ई’, ‘जी’ व ‘आय’ या प्रभागांतील सक्शन कम जेटींग मशीन सुरू करू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकी अंदाजे ३६ लाख रुपये खर्चाच्या या मशीन खरेदीचा गाजावाजा करण्याचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्न वसई-विरारकरांनी केला आहे.विशेष म्हणजे परिवहन नोंदणीआधीच महापालिकेने दोन शिफ़्टमध्ये दोन चालक व प्रत्येक मशीनवर चार कामगार असे २४ जण नियुक्त केले आहेत. मात्र नोंदणी होईपर्यंत या कामगारांना पोसण्याचे कामही महापालिकेला आता करावे लागणार आहे.

शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे शहरातील सफाई कामगारांकरता ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज योजने’अंतर्गत वसई-विरार शहर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरता व शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करण्याकामी या सहा अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन खरेदी केलेल्या आहेत. यामध्ये सफाई कामगाराला प्रत्यक्ष गटारामध्ये न उतरता सक्शन कम जेटींग मशीनद्वारे गटारामधील गाळ सफाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते.या सक्शन कम जेटींग मशीन खरेदी करून आज तब्बल एक महिना झाला आहे. मात्र परिवहन विभागाच्या नोंदणीअभावी या मशीन्स उभ्या करून ठेवण्याची नामुश्की पालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे.

- Advertisement -

दाटीवाटीच्या मशीन निष्काम ठरणार?

सक्शन कम जेटींग मशीनद्वारे गटारामधील गाळ सफाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगाराला प्रत्यक्ष गटारामध्ये उतरावे लागणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र वसई-विरार-नालासोपारा शहरातील बहुतांश भाग हा दाटीवाटी आणि चिंचोळा आहे. याभागात या मशीन जाण्यास अड़चण येणार आहे. अशा परिसरात सफाई कामगारांना पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेने केलेला दावा फ़ोल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येत्या एक-दोन दिवसांत या गाड्याची नोंदणी होईल. संबंधित कंपनीकडून कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी होते.आता ही पूर्तता झाली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत नोंदणी होऊन गाड्या कार्यान्वित होतील.
– अंजिक्य बगाडे, उपायुक्त

- Advertisement -

महापालिकेचे ‘स्लोगन’ गायब

वसई-विरार महापालिका स्थापनेपासून महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. यामकाळात महापालिकेच्या परिवहनच्या बसेस आणि कचरा वाहक गाड्यावर ‘प्रगतीचा प्रकाश, हाच बहुजन विकास’ या आशयाचे स्लोगन लिहिण्यात आले होते. मात्र मागील वर्षी २८ जूनला महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यापासून व कोरोना संक्रमणामुळे महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त गंगाथरन डी. कामकाज पाहत आहेत. तर या प्रशासकीय राजवटीआड महापालिकेवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे वर्चस्व ठेवून आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात प्रचंड राजकीय तेढ़ निर्माण झाले होते. याच राजकारणाचा भाग व स्लोगनमधून बविआचा अप्रत्यक्ष प्रचार होतो. नव्या कचरा वाहक गाड्यावरील ठळक अक्षरातील स्लोगन लहान करण्यात आला आहे. तर परिवहनचा ठेकेदार बदलला गेल्यानंतर नव्या ठेकेदाराने आणलेल्या नवीन बसवरील हा स्लोगन गायब करण्यात आला आहे.हा प्रकार म्हणजे शिवसेनेने बविआला शह दिल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा –

हिंदमाता येथे पाच फुटापर्यंत साचणारे पाणी आता फक्त गुडघाभर; महापौरांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -