घरपालघरविषाणूजन्य रोगांपासून जनावरांची काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाकडून आवाहन

विषाणूजन्य रोगांपासून जनावरांची काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाकडून आवाहन

Subscribe

ही खपली निघून गेली तर एक रुपयांच्या नाण्याप्रमाणे गोल खड्डा होतो आणि आत गुलाबी किंवा लाल रंगाची त्वचा दिसू लागते. याशिवाय जनावरांचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न खाणे, लसिका ग्रंथीमध्ये सूज येणे, पायाला सूज येणे, पोळाला सूज येणे, दूध उत्पादनात कमी होणे, गाभडने, जनावरांमध्ये वंधत्व येणे आणि थोड्या प्रमाणात मरतुक होणे, अशी लक्षणे आढळून येतात.

वसई: जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात जनावरांवर विषाणूजन्य आजार आले असल्याची भीती संपूर्ण तालुक्यात असून काही इतर भागातील आजारी जनावरांचे फोटो समाज माध्यमांतून फिरत आहेत. जव्हार तालुक्यामध्ये लंपी स्किन या विषाणूजन्य रोगाच्या कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती जव्हार तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. जनावरांना दोन ते तीन दिवसांसाठी मध्यम तीव्रतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावर सर्वत्र कडक घट्ट गोलाकार फोडी येतात. या फोडीच्या कडा घट्ट आणि वर आलेल्या दिसतात. ज्यामध्ये वरची त्वचा आतील कातडे आणि स्नायूंचा भागदेखील चिकटलेला आढळतो. काही कालावधीनंतर हे फोड काळे पडतात व त्यावर खपली तयार होते. ही खपली निघून गेली तर एक रुपयांच्या नाण्याप्रमाणे गोल खड्डा होतो आणि आत गुलाबी किंवा लाल रंगाची त्वचा दिसू लागते. याशिवाय जनावरांचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न खाणे, लसिका ग्रंथीमध्ये सूज येणे, पायाला सूज येणे, पोळाला सूज येणे, दूध उत्पादनात कमी होणे, गाभडने, जनावरांमध्ये वंधत्व येणे आणि थोड्या प्रमाणात मरतुक होणे, अशी लक्षणे आढळून येतात.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसिजचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारचा पशु आढळला असल्याची चर्चा असल्याने जव्हार तालुक्यातील पशुपालक हवालदिल झाला आहे. परंतु पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाने सकारात्मक निदान करण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहन जव्हार तालुका पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून तो विषाणूजन्य व साथीचा आजार आहे. हा रोग प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांच्यात आढळून येतो. हा आजार माणसांना होत नाही. सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार साधारणपणे दोन-तीन आठवड्यांत बरा होऊ शकतो. गोठ्यामध्ये व निरोगी जनावरांवर कीटकनाशके फवारणी करणे, लक्षणे आढळलेल्या गावांमधून इतर जनावरांची वाहतूक, बाजार आणि इतर दळणवळण बंद करावे, आजारामुळे दगावलेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरून घ्यावे.

- Advertisement -

जव्हार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरती पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागाकडून लंपी स्कीन या आजाराविषयी पशुपालकांना योग्य प्रकारे माहिती देऊन जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.सध्या तरी कोणत्याही प्रकारे लंपी स्कीन आजाराचे लक्षणे, पशूंना जव्हार तालुक्यात आढळले नाहीत.
– डॉ. राजीव कुमार सातव,
पशु संवर्धन अधिकारी, वाळवंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -