घरपालघरमहावितरणवर जनतादलाचा आक्रोश मोर्चा

महावितरणवर जनतादलाचा आक्रोश मोर्चा

Subscribe

तिच्या भावाने ३१ ऑगस्टला लेखी मागणी केल्यावरही पंचनामा प्रती दिल्या नाहीत. त्या प्रती ७ सप्टेंबरला दिल्या गेल्या, त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरच जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

वसई : विरारजवळील बोळींज गावात विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या तनिष्का कांबळेप्रकरणात महावितरण आणि महापालिकेचा हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावेत, यामागणीसाठी जनता दल (से) सोमवारी विरार येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहे.
अर्नाळा पोलिसांनी घटनेच्या दिवशी पंचनामा केला होता.  १७ ऑगस्टला पोस्टमार्टम रिपोर्ट आला. मात्र, गुन्हा ३१ ऑगस्टला दाखल करण्यात आला. तनिष्काच्या कुटुंबियांनी मागणी करूनही त्यांना अर्नाळा सागरी पोलिसांनी हेलपाटे घालायला लावले. तिच्या भावाने ३१ ऑगस्टला लेखी मागणी केल्यावरही पंचनामा प्रती दिल्या नाहीत. त्या प्रती ७ सप्टेंबरला दिल्या गेल्या, त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरच जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

अंडरग्राऊंड केबल ३ फूट खोल टाकायची असते. याप्रकरणात ती वर कशी होती?. रस्त्याच्या सळ्यांना केबलमधून करंट लिक झाला असे सांगण्यात आले. म्हणजे स्लॅबमधील सळ्याच्या जाळीत करंट जाऊन भयंकर अनर्थ घडू शकतो. केबलमधून करंट लिक झाला तर मग या केबलचा दर्जा काय होता? केबल कोणत्या कंपनीची होती?. ठेकेदार कोण होता?. महावितरणचा कोण अधिकारी देखरेख करीत होता?. महापालिकेने स्लॅब टाकताना सळ्या उघड्या कशा ठेवल्या?. केबल इतकी वर आहे हे महावितरणला कळवले की नाही? अशी सर्वच जबाबदारी महावितरण आणि महापालिकेला टाळता येणार नाही. यामध्ये लाभार्थी कोण होते का?. याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती शासनाने नेमावी.अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा नोंदवायला १६ दिवस का लावले? यात कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न आहे काय? मागील २५ वर्षांत असे अनेक मृत्यू झाले. त्यांच्यावर काय कारवाई झाली?. किती अपराध्यांना शिक्षा झाल्या याची माहिती पोलिसांनी प्रसिद्ध करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तनिष्काला न्याय मिळवून देण्यासाठी जनता दलाचा सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. जनता दलाचे प्रताप होगाडे मोर्चाचे नेतृत्व करणार असून मनवेल तुस्कानो, जिल्हा अध्यक्ष कुमार राऊत, उपाध्यक्ष पायस मच्याडो, जितेंद्र सत्पाळकर, अल्ताफ शेख, रघु कळभाटे, प्रकाश पाटील, संदेश घोलप आदी पदाधिकारी त्यात सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

तनिष्काच्या न्यायासाठी जनता दलातर्फे आम जनतेचा मोर्चा
बोळींज येथील तनिष्का लक्ष्मण कांबळे या १५ वर्षीय मुलीचा वीजेचा जबर शॉक लागल्याने १६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. भ्रष्ट आणि बेफीर सरकारी व्यवस्थेची ती बळी ठरली. रस्त्याच्या कडेने जात असताना स्लॅबमधील बाहेर आलेल्या सळ्यातून जबर वीज शॉक लागल्याने ७-८ मिनिटे ती तडफडत होती. सोबतच्या मुलाला शॉक लागला पण तो फेकला गेल्याने त्याला वाचवता आले. तनिष्काचा मृत्यू निष्काळजी व बेफिकीरीमुळे झाला. त्यामुळे महावितरण आणि वसई विरार महापालिकेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनता दलाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -