घरताज्या घडामोडीमुंद्रा बंदरात 3000 किलो ड्रग्ज जप्त, एनआयएकडून तिघांना अटक

मुंद्रा बंदरात 3000 किलो ड्रग्ज जप्त, एनआयएकडून तिघांना अटक

Subscribe

गुजरातमधील मुंद्रा बंदरात 3000 किलो ड्रग्ज एनआयएकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एनआयएने तिघांना अटक केली आहे. यापूर्वीदेखील दिल्लीतून दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यामु्ळे एकूण या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या आरोपींची नावं राह मातुल्लाह, इश्विंदर सिंग आणि जसबीर सिंग अशी आहेत.

14 सप्टेंबर रोजी या तिघांनाही आरोपींनी अटक केली होती. समुद्रामार्गे विविध कंटेनरमधून ड्रग्जच्या खेप आणल्याप्रकरणी अटक झाली होती. परंतु या तिघांचीही कसून चौकशी करण्यात आल्यानंतर मुंद्रा ड्रग्ज प्रकरणात त्यांचाही समावेश असल्याचं उघडकीस आलं आहे.

- Advertisement -

26 ऑगस्टला एनआयएनं दिल्लीतील 20 विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दोन जणांना अटक झाली होती. हरप्रीत सिंग तलवार ऊर्फ कबीर तलवार, प्रिन्स शर्मा शी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळीतील लोक आहेत.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून 2 हजार कोटींहून अधिक किमतीचे 750 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुद्धा नऊ पाकिस्तानी नागरिकांसह 280 कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एटीएसने अटक केली होती.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात मुंद्रा बंदरावर ड्रग्ज संदर्भात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. 21 हजार कोटींची 3 हजार किलो वजनाच्या ड्रग्जची खेप जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या दृष्टीकोनातून तपासासाठी NIAकडे सोपवण्यात आले होते.


हेही वाचा : 2024पूर्वी ईशान्य भारतातील सर्व सीमाप्रश्नांसह इतर समस्या सोडविणार, केंद्र सरकारचा निर्धार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -