घर पालघर आदिवासी दिनालाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची दांडी

आदिवासी दिनालाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची दांडी

Subscribe

आदिवासी दिनानिमित्त शासनाने नेमकी सुट्टी जाहीर केली यात चूक कोणाची? कारण शाळेच्या दिवशी येणार्‍याच जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करा असा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा शिक्षकांसाठी आदेश आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोखाडा : ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो.या दिनानिमित्त जरी जिल्हा परिषद शाळांना शासकीय सुट्टी जाहीर होते.परंतु, तरी सुद्धा शिक्षक ज्या आदिवासी भागात काम करतो त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून पगार घेतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी निदान या दिवशी शाळेत आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करणे गरजेचे होते.परंतु, शासकीय सुट्टी मिळाली आहे त्यामुळे घरीच थांबा या मानसिकतेतून तालुक्यातील बर्‍याचशा शाळा शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे सकाळी बंदच होत्या.
मी भला न माझा पगार भला सुट्टी मिळाली तर घरी आराम करा ” अशा मानसिकतेतून काम करणार्‍या शिक्षकांविरोधात संताप व्यक्त होत आहे.आदिवासी दिनानिमित्त शासनाने नेमकी सुट्टी जाहीर केली यात चूक कोणाची? कारण शाळेच्या दिवशी येणार्‍याच जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करा असा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा शिक्षकांसाठी आदेश आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यामुळे किमान आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या आदिवासी विद्यार्थ्यांमुळे होतो अशा आदिवासी भागातील सर्व शाळांनी आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने म्हणा किंवा आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करुन तरी साजरा करायला हवा. तशी माफक अपेक्षा व्यक्त होत असून गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही

- Advertisement -

शिक्षकांकडून आदेशांना केराची टोपली

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जरी शासकीय सुट्टी जाहीर केलेली असली तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी आप आपल्या शाळेत थोडा वेळ का होईना जाऊन आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करावे असे वरिष्ठांचे आदेश असतानाही अनेक शिक्षकांनी सुट्टी मिळाली म्हणून घरीच राहणे पसंत केले होते.एरवी शाळा असली की नाशिक येथून ये -जा करणार्‍या शिक्षकांची मोठी रेलचेल बघायला मिळते. परंतु आज सुट्टी आहे.त्यामुळे नाशिक येथून ये जा करणारे शिक्षक मोखाड्यात फिरकलेच नाहीत. केवळ दोन किंवा चार शिक्षकी शाळेतील शिक्षकांपैकी कोणी एकानेच शाळेत जाऊन क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले. तर काही शाळांची टाळेबंदी उघडलीच नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -