घरपालघरफेरीवाल्यांविरोधातील कारवाई ठरली फुसका बार

फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ठरली फुसका बार

Subscribe

तोच तारापूर मुख्य रस्त्यावर स्टेशनपासून सिडको बायपासपर्यंत फेरीवाले,फळे आणि भाजीपाला विक्रेते,खाद्यपदार्थ विक्रेते,हातगाडी आणि टपर्‍यांनी बेकायदा अतिक्रमण करून पुन्हा जागा अडवायला सुरूवात केली आहे.

सचिन पाटील,बोईसर: बोईसर ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर केलेली धडक कारवाई फुसका बार ठरली आहे.कारवाईला १५ दिवस उलटत नाही तोच फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवर कब्जा करीत आपली दुकाने थाटल्याने ग्रामपंचायतीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे आणि उपसरपंच निलम संखे यांनी दोन आठवड्यापूर्वी तारापूर मुख्य रस्त्यावरील रस्ता अडवून बसलेल्या बेकायदा फेरीवाले,हातगाडी आणि टपर्‍या यांच्यावर रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करीत रस्ता मोकळा केला होता.यामुळे गर्दीतून वाट काढणारे वाहनचालक आणि पादचारी यांना दिलासा मिळाला होता.मात्र या कारवाईला दोन आठवडे उलटत नाहीत तोच तारापूर मुख्य रस्त्यावर स्टेशनपासून सिडको बायपासपर्यंत फेरीवाले,फळे आणि भाजीपाला विक्रेते,खाद्यपदार्थ विक्रेते,हातगाडी आणि टपर्‍यांनी बेकायदा अतिक्रमण करून पुन्हा जागा अडवायला सुरूवात केली आहे.

फेरीवाले मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि जिथे मोकळी जागा मिळेल तिथे आपली दुकाने थाटत आहेत.रेल्वे स्टेशन आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अनधिकृत टपर्‍या टाकून जागा बळकावली आहे.त्यामुळे अरुंद रस्त्यामुळे स्टेशन परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. बोईसर ग्रामपंचायत हद्दीत फेरीवाला धोरणाचा अक्षरक्ष: बोजवारा उडालेला आहे.त्यातच बेकायदा फेरीवाल्यांविरोधात तक्रारी आल्यावर ग्रामपंचायत प्रशासन छोट्या फेरीवाल्यांवर फुटकळ कारवाईचा दिखावा करते.मात्र बडे फेरीवाले आणि शिवकला आर्केड इमारतीसमोर बेकायदा धंदा करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास मात्र टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीची फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेली कारवाई वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -