घरपालघरलोकसहभागातून एका दिवसात उभी केली स्मशानभूमी

लोकसहभागातून एका दिवसात उभी केली स्मशानभूमी

Subscribe

२० ते २५ घरे असलेल्या पाड्यात स्मशानभूमी नसल्याने कोणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन ते अडीच किमी अंतरवरील स्मशानभूमीपर्यंत पायपीट करावी लागते.पावसाळ्यात तर उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठी कुचंबणा सहन करावी लागत होती.

बोईसर: बोईसर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकी पाड्यात गावकर्‍यांनी एकत्र येत अवघ्या एका दिवसात स्मशानभूमी उभी केली आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पालघर जिल्ह्यातील काही गावपाडे विकासापासून अजूनही कोसो दूर आहेत.मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी नागरीकांना अजूनही झगडावे लागत आहे.बोईसरपासून अवघ्या दोन किमी अंतरावरील राणीशिगाव-नेवाळे ग्रुपग्रामपंचायत मधील चौकी पाड्यात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार उघड्यावर करावे लागत आहेत.२० ते २५ घरे असलेल्या पाड्यात स्मशानभूमी नसल्याने कोणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन ते अडीच किमी अंतरवरील स्मशानभूमीपर्यंत पायपीट करावी लागते.पावसाळ्यात तर उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठी कुचंबणा सहन करावी लागत होती.

चौकी पाड्यात कायमस्वरूपी स्मशानभूमी व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करून झाले.मात्र कोणीच दाद देत नसल्याने अखेर राणीशिगाव-नेवाळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किशोर अरविंद धोडी यांनी पुढाकार घेत प्रवीण धोडी,उमेश धोडी,सुनील धोडी,रूपेश धोडी,भरत धोडी,मुकेश धोडी,नितीन धोडी या सर्व गाव कमिटी सदस्य आणि चौक पाड्यातील रहीवासी यांनी ९ एप्रिलला रविवारी सुट्टीच्या दिवशी एकत्र येत लोकसहभागातून दिवसभर श्रमदान करीत स्मशानभूमीची बांधणी करून दिली. स्मशानभूमीची उभारणी करण्यासाठी कोणी लोखंडी अँगल घेऊन आले तर कोणी घमेले,फावडे, रेती,सिमेंट असे ज्याला शक्य होईल ते साहित्य एकत्र करीत एका दिवसात स्मशानभूमी उभारत सर्व व्यवस्थेला तरुणांनी एक आदर्श घालून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -