घरपालघरगॅस दरवाढीमुळे महिलांचा पुन्हा चुलीकडे मोर्चा

गॅस दरवाढीमुळे महिलांचा पुन्हा चुलीकडे मोर्चा

Subscribe

गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना गॅस परवडत नसल्याने केवळ शोभेची वस्तू बनली असून गॅस सिलेंडरचे दर गोरगरीबांना सोसावेनासे झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला गॅसवरून पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.

ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून चुलीवरचा स्वयंपाक टाळला जावा व पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत गॅस आला. मात्र, गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना गॅस परवडत नसल्याने केवळ शोभेची वस्तू बनली असून गॅस सिलेंडरचे दर गोरगरीबांना सोसावेनासे झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला गॅसवरून पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर पंधरा-वीस रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर पंधरवड्यापूर्वी तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता दरवाढ करताना या कुटुंबाना गृहीतच धरण्यात आलेले नाही. सुरुवातीला सिलेंडरच्या किंमती ४०० रुपयांचा घरात होत्या. आता तर तो ८०० रुपयांवर गेल्याने लाभार्थींनी महिन्याला एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असल्याने प्रत्येकाचे बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असतांना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे संकट उभे राहिले आहे.

उज्वला योजनेतून सिलेंडर मिळाल्याने खूप आनंद झाला होता. मात्र, दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची बाब ठरत आहे. त्यात आता गॅस सिलेंडरचे दर वाढत असल्याने गॅस वापरणे कठीण झाले आहे. महागडा गॅस परवडत नसल्याने पुन्हा चुलीचा वापर करावा लागत आहे.
– योगिता रोकडे, गृहिणी

- Advertisement -

स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत गोवऱ्या व सरपणासाठी फिरावे लागते. महिलांचे हे हाल थांबवून व जंगलांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे,या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, सिलेंडरच्या भाव गगनाला भिडल्यामूळे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळालेली कुटुंबे आता गॅस महागल्याने पुन्हा चुलीच्या दिशेने वळू लागली आहेत. उज्ज्वला योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहे. आर्थिक जनगणनेच्या आधारावर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम असते. त्यात घरातील दररोज लागणारा किराणा, भाजीपाला याचा ताळमेळ बसवणे कठीण होत असताना आता गॅस सिलेंडरचे दर कसे परवडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाना महागडा गॅस परवडत नसल्याने नाईलाजाने पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. महिन्याला जेमतेम तीन-साडेतीन हजाराची मिळकत असणाऱ्या कुटुंबात सिलेंडरसाठी ८०० रुपये आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण होतो आहे. लाभार्थींना मोफत गॅस मिळाल्यानंतर महिलांनी सरपण वापरण्यास फाटा दिला होता. मात्र, आता त्या पुन्हा जवळ कराव्या लागत आहेत.

- Advertisement -

महिनानिहाय गॅस दरवाढ

डिसेंबर – ५९७/- रुपये
जानेवारी – ६९७/- रुपये ( पंधरा दिवसानंतर – ७२२/- रुपये)
फेब्रुवारी – ७७२.५०/- रुपये
मार्च – ९२२/- रुपये

हेही वाचा –

Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -