निसर्ग चक्रीवादळ – समुद्रकिनारी यंत्रणा सज्ज!

निसर्ग चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत असून सतर्कच्या सर्व उपाययोजना संभाव्य जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने समुद्र किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळाचा धोका अधिक असून कोकण किनारपट्टी जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, मुंबई, पालघर अशा ठिकाणी एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.