घरताज्या घडामोडीNew Year 2022: अलविदा २०२१! देशभरात नवीन वर्षाचा जल्लोष

New Year 2022: अलविदा २०२१! देशभरात नवीन वर्षाचा जल्लोष

Subscribe

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरात लोक जल्लोष साजरा करत आहेत. नवे वर्ष सुरु व्हायला काही तास बाकी आहेत. रात्री १२ वाजल्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. देशांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

- Advertisement -

न्यूझीलँडच्या ऑकलँड शहरात पहिल्यांदा नव्या वर्षाची सुरुवात होते. न्यूझीलँडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचे स्वागत केले जात आहे. ऑकलँडच्या वेळेनुसार रात्री १२ वाजता लोकांनी मोठ्या जल्लोषात नाचत नवीन वर्षाचे स्वागत केले.

मुंबईसह देशभरातही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पहायाल मिळत आहे. मुंबईकरांनी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनारी गर्दी केली होती. मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईत सेलिब्रेशनवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर नागरिकांना फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -