घरराजकारणKarnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'या' आमदाराची चर्चा; जाणून घ्या कोण...

Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची चर्चा; जाणून घ्या कोण आहे ही ‘पावरफुल लेडी’

Subscribe

काँग्रेसच्या तडफदार आमदार दिव्या मदेरणा याही गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात आहेत. दिव्या तेथील काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो आणि जनसंपर्क प्रचारात भाग घेत आहेत. राजस्थानच्या आमदार दिव्या मदेरणा यांना  कर्नाटकातील स्टार प्रचारक करण्यात आलं आहे.

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह पक्षाच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांना कर्नाटक निवडणुकीचे स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी सातत्याने रोड शो आणि प्रचार करत आहेत. राजस्थान काँग्रेसचे निवडक नेतेही तेथे प्रचारासाठी गेले आहेत. काँग्रेसच्या तडफदार आमदार दिव्या मदेरणा याही गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात आहेत. दिव्या तेथील काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो आणि जनसंपर्क प्रचारात भाग घेत आहेत. राजस्थानच्या आमदार दिव्या मदेरणा यांना  कर्नाटकातील स्टार प्रचारक करण्यात आलं आहे.(  Congress MLA Divya Maderna is in Karnataka participating in road shows and PR campaigns in support of Congress candidates )

राजस्थानी मतं मिळवण्यचा प्रयत्न

राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील ओसियाच्या आमदार दिव्या मदेरणा कर्नाटकात राहणाऱ्या राजस्थानींवर लक्ष केंद्रित करत आहेत. काँग्रेसच्या समर्थनार्थ त्या तिथल्या स्थानिक लोकांकडून सतत मतं मागत असल्या तरी, खासकरून मारवाडी संघटना आणि इतर राजस्थानी कुटुंबांच्या संघटनांमधून त्या त्यांना वैयक्तिकरित्या भेटत आहेत. काँग्रेसच्या धोरणांचा प्रचार करण्यासोबतच दिव्या केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारची धोरणं ही जनविरोधी असल्याचं त्या जनतेसमोर सांगत आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: बारसू रिफायनरी वाद : ‘बळाचा वापर करण्यापेक्षा…’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका )

गांधी नगर (बेंगळुरू) येथील रोड शोला मोठी गर्दी

कर्नाटक काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिनेश गुंडूराव हे गांधी नगर (बेंगळुरू) येथून काँग्रेसचे उमेदवार आहेत. गुरुवार, 27 एप्रिल रोजी गुंडू राव यांच्या समर्थनार्थ रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोमध्ये दिनेश गुंडूराव यांच्यासोबत काँग्रेस आमदार दिव्या मदेरणाही होत्या. यादरम्यान मारवाडी संघटनेसह हजारो राजस्थानी कुटुंबे या रोड शोमध्ये उपस्थित होते. मारवाडी सर्व समाजाची तेथे मोठी गर्दी झाली होती. कारण कर्नाटकातील जोधपूर विभागात हजारो कुटुंबे राहतात. दिव्या मदेरणासोबत बहुतेक कुटुंबांचा चांगला संबंध आहे.

- Advertisement -

कर्नाटकात येत्या 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकमेकांवर टीका केली जात आहे. एकमेकांवर आगपाखड करत असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांची जीभ घसरतानाही दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साप म्हटलं. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या आमदाराची जीभ घसरली. त्यानेही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना विषकन्या संबोधलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -