घरमहाराष्ट्रState Heavy Rain: पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

State Heavy Rain: पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Subscribe

आता अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढला आहे. 2 मेपर्यंत राज्यातील सर्वच भागांत अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. एकीकडे कडाक्याचं ऊन तर त्यात अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी 5 दिवसांनी वाढला आहे. 2 मेपर्यंत राज्यातील सर्वच भागांत अवकाळी पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा मे महिन्याची सुरुवात पावसाने होत आहे. आठवडाभर अवकाळीचे वातावरण राहणार असून, आगामी चार दिवस राज्यात गडगडाटासह अवकाळीचा जोर राहणार आहे. ( State Heavy Rain Severe weather warning in the state for the next five days )

प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील शहादा, चोरडा, यावल या भागांसह संपूर्ण विदर्भात पावासाचा जोर जास्त राहणार आहे. 28 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली या भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात मात्र हलका ते मध्यम पावासाचा अंदाज आहे.

- Advertisement -

विदर्भात अधिक पावसाची शक्यता

आगामी चार दिवस विदर्भात पावसाचा वेग जास्त राहणार आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

( हेही वाचा: मनोज सौनिक नवे मुख्य सचिव; रविवारी पदभार स्वीकारणार )

- Advertisement -

अवकाळी पावसात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. जिल्ह्यातील बीड, गेवराई, केड, अंबाजोगाई, माजलगावसह सर्वच ठिकाणी तुफान पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तर यादरम्यान वीज पडून शेतात काम करत असताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले. ही दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील केळगाव आणि काळेगावमध्ये घडली.

( हेही वाचा: Heavy Rain : मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका; ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -