घरराजकारण"...अन्यथा सभेत घुसणार", गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा

“…अन्यथा सभेत घुसणार”, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा

Subscribe

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जळगावचा दौरा करणार आहेत. या जळगाव दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे २३ एप्रिलला पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानात भव्य सभा घेणार आहे. जळगाव हे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. “उद्धव ठाकरेंच्या जळगावच्या सभेत संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा सभेत घुसणार आहोत”, असा इशारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे. माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील (R. O. Patil) यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या भव्य सभेचे आयोजन केले आहे.

गुलाबराव पाटील ठाकरे गटाच्या सभेसंदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार मोठे उपकार होते. आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत. तर उद्धव ठाकरेंचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. परंतु, सभेत संजय राऊत माझ्यावर बोलले, तर मी एसपींना पत्र देणार आहे. आणि संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा सभेत घुसणार आहोत”, असा धमकी वजा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच आर. ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरेसोबत पहिल्यापासून चांगले संबंध होते. त्याच प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे जळगावला येत आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisement -

यापूर्वी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा ही खेड, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव येथे झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंतच्या सर्व सभेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी बेरोजगारी, महागाई, शेकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर तोफ डागली आहे. यामुळे उद्धव ठाकरे हे जळवगाच्या सभेत कोणावर बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा आहे उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा

- Advertisement -
  • सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे जळगाव विमानतळावर दाखल होणार
  • सकाळी १२.३० वाजता उद्धव ठाकरे पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात पोहोचतील
  • सायंकाळी ४. ३० वाजता उद्धव ठाकरे आर. ओ. पाटील यांच्या प्रयोगशाळेचे उद्धघाटन करणार
  • सायंकाळी ५.१५ वाजता आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे उद्धव ठाकरे उद्धघाटन करणार
  • सायंकाळी ६.१५ वाजता एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -