घरमहाराष्ट्रमराठवाडाLok Sabha 2024 : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले..., एकनाथ...

Lok Sabha 2024 : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले…, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

महादेव जानकार यांना 17 भाषा येतात. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर विकास आणि प्रगतीची भाषाही ते शिकतील आणि परभणीच्या विकासासाठी आकाश-पाताळ एक करतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची प्रचारसभा पाथरी येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

एका सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने काहींना पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिव्या देत आहेत. पण हा शिवीगाळ मलाच नव्हे तर, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले, त्यांच्यावर योग्य संस्कार मात्र झालेले नाहीत. अशांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

या सभेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी महादेव जानकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. बारामतीत साडेतीन लाखांचा लीड 34 हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता, असे सांगत, आता महादेव जानकर परभणीत इतिहास घडविणार आहेत. ते नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

महादेव जानकार यांना 17 भाषा येतात. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर विकास आणि प्रगतीची भाषाही ते शिकतील आणि परभणीच्या विकासासाठी आकाश-पाताळ एक करतील, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले आणि त्यांना गरिबीत ठेवले, मात्र मोदी यांनी मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – Lok Sabha 2024: भर पावसात ठाकरे बरसले; हिंमत असेल तर मला संपवून दाखवा


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -