घररायगडस्ट्रक्चरल ऑडिटमध्ये महाडमधील अमिना इमारत धोकादायक, इमारत तत्काळ खाली करण्याचा सल्ला

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये महाडमधील अमिना इमारत धोकादायक, इमारत तत्काळ खाली करण्याचा सल्ला

Subscribe

अमिना कॉम्प्लेक्समधील बारा रहिवाशांनी प्रथम सोलकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यामध्ये अति धोकादायक असा अहवाल आल्याने इमारतीमधील सहा रहिवाशांनी मेहंदळे यांच्या एजन्सीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले. यामध्ये ही इमारत साधारण धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. यामुळे एकाच इमारतीच्या दोन एजन्सीमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत रहिवाशी संभ्रमात पडले.

महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळल्यानंतर शहरातील अनेक धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यानंतर धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. महाडमध्ये आता आणखी एका धोकादायक इमारतीची भर पडली आहे. शहरातील अमिना या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्थापत्य विभागाच्या तज्ञ पथकाने केले. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत अति धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना ही इमारत तात्काळ खाली करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महाडमध्ये तारिक गार्डन ही इमारत ऑगस्ट २०२० मध्ये कोसळली होती. कोकणातील इमारत कोसळण्याची ही पहिलीच घटना असल्याने या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट केले. यामध्ये ३०४ इमारती धोकादायक आढळल्या. यातील जवळपास ४० इमारतींची दुरुस्ती करण्यात आली. तर ३३ इमारतीमधील रहिवाशांनी इमारती खाली केल्या आहेत. अशातच शहरातील एस.टी.स्थानक परिसरातील अमिना कॉम्प्लेक्सची तक्रार रहिवाशांनी केली.

- Advertisement -

अमिना कॉम्प्लेक्समधील बारा रहिवाशांनी प्रथम सोलकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यामध्ये अति धोकादायक असा अहवाल आल्याने इमारतीमधील सहा रहिवाशांनी मेहंदळे यांच्या एजन्सीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले. यामध्ये ही इमारत साधारण धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. यामुळे एकाच इमारतीच्या दोन एजन्सीमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत रहिवाशी संभ्रमात पडले. यामुळे या सहा रहिवाशांनी महाड नगर पालिकेमधून स्ट्रक्चरल ऑडिट केले जावे अशी मागणी करून ऑडिटचे एक लाख रुपये फी देखील भरली. त्यानुसार महाड नगर पालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्थापत्य विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करून मिळावे अशी मागणी केली.

विद्यापीठाच्या तज्ञ पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी स्ट्रक्चरल ऑडीट केले. या पथकाने जमा केलेल्या नमुन्यांच्या आधारे सदर इमारतीचा सी १ गटात समावेश करून अति धोकादायक असल्याचा अहवाल सादर केला आहे. तसेच रहिवाशांनी तत्काळ इमारत खाली करावी असा सल्ला दिला आहे. महाड नगर पालिकेकडूनही रहिवाशांना नोटीस देऊन इमारत खाली करण्याबाबत कळवले जाणार आहे.

- Advertisement -

५ कुटुंबे इमारतीमध्ये वास्तव्यास
अमिना इमारतीमधील ६ कुटुंबांनी तारीक गार्डन दुर्घटना घडताच इमारत सोडली आहे. अद्याप जवळपास ५ कुटुंबे या धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती शबिस्ता लांबे यांनी दिली. इमारत बांधकाम करताना मंजूर प्लॅनपेक्षा अधिक बांधकाम केले असल्याचा आरोप देखील इमारत सोडलेल्या रहिवाशांनी केला आहे. तारिक गार्डनप्रमाणे प्रशासनाने दिरंगाई न करता येथील उर्वरित रहिवाशांना देखील तत्काळ इमारत खाली करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ही इमारत अति धोकादायक आहे. यामुळे पालिका प्रशासन याबाबत तत्काळ पावले उचलत असून रहिवाशांनी देखील इमारत खाली करावी.
– महादेव रोडगे, मुख्याधिकारी महाड नगर पालिका

वर्षभरापासून आम्ही अमिना इमारत खाली करून बाहेर राहत आहोत. धोकादायक अहवाल असून देखील इमारत बांधकाम करणारा व्यवसायिक दाद देत नसून इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करण्यातच समाधान मानत आहे. यामुळे इमारतीमधील रहिवाशांना पालिकेने न्याय मिळवून द्यावा आणि होणारी दुर्घटना टाळावी
– अब्दुल हकीम अब्दुल रज्जाक, अमिना रहिवाशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -