घररायगडकिल्ले रायगडावर अलोट गर्दी; सोहळा न पाहताच शिवप्रेमींचा परतीचा प्रवास

किल्ले रायगडावर अलोट गर्दी; सोहळा न पाहताच शिवप्रेमींचा परतीचा प्रवास

Subscribe

मंंगळवारी (६जून) तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना गडावर अलोट गर्दी झाल्याने लाखो शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होतात परतीचा प्रवास करावा लागला आहे. यामुळे पहाटेपासूनच महाडपासून किल्ले रायगडपर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर ठिकाठिकाणी वाहनांची कोंडी तसेच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते.

महाड: मंंगळवारी (६जून) तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना गडावर अलोट गर्दी झाल्याने लाखो शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होतात परतीचा प्रवास करावा लागला आहे. यामुळे पहाटेपासूनच महाडपासून किल्ले रायगडपर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर ठिकाठिकाणी वाहनांची कोंडी तसेच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते.
साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनाच्या समितीकडून आवाहन करण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली पाच जूनपासूनच गडावर शिवभक्त दाखल झाले होते. सहा जून रोजी पहाटेपासूनच अलोट गर्दी झाली. रायगडावर झालेली प्रचंड गर्दी पाहून पोलिसांनी देखील किल्ले रायगड मार्ग शिवभक्तांसाठी बंद केला. रायगडकडे जाणार्‍या महाड रायगड तसेच माणगावमार्गे माणगाव निजामपूर रायगड या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महान रायगड रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे महाडजवळ नातेखिंडपासून ते किल्ले रायगड पर्यंत प्रचंड वाहतूूक कोंडी झाली. रायगडावर पायी चढून जाणार्‍यांची संख्या लाखोंमध्ये असल्याने नाना दरवाजा या ठिकाणी सौम्य स्वरूपात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
महाड रायगड मार्गावर नातेखिंडपासून जवळपास २४ किलोमीटर अंतरावर ट्रॅफिक जाम झाली होती यामुळे नातेखिंड येथूनच हजारो शिवभक्तांनी पायी चालत जाणेच पसंत केले आहे. एवढ्या लांबून आल्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ३५० वा सोहळा याची देही याची डोळा न पाहता आल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -