घररायगडमहाडमधील नुकसानग्रस्तांना ३० कोटींचे वाटप

महाडमधील नुकसानग्रस्तांना ३० कोटींचे वाटप

Subscribe

गतवर्षी २२ जुलैला महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी व काळ नदीला महापूर आल्याने महाड शहर व नदीकिनारी असणार्‍या अनेक गावांना पुराचा फटका बसला. या पुरामध्ये घरेदारे, कपडालत्ता, जनावरे, दुकाने, शेती व औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

महाड शहर आणि परिसरातील अनेक गावांना २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. अशा तब्बल २६ हजार नुकसानग्रस्तांना सुमारे ३० कोटी रुपयांचे वाटप महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. मार्च २०२२ अखेरपर्यंत नुकसानीची रक्कम वाटण्याची प्रक्रिया सुरूच होती. तरीही काही लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने नुकसानभरपाईची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही.

गतवर्षी २२ जुलैला महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी व काळ नदीला महापूर आल्याने महाड शहर व नदीकिनारी असणार्‍या अनेक गावांना पुराचा फटका बसला. या पुरामध्ये घरेदारे, कपडालत्ता, जनावरे, दुकाने, शेती व औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाकडून अनेक दिवस नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होती. सारेच उद्धवस्त झालेल्या महाड व परिसरामध्ये राज्य सरकारकडून तातडीची मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार महाड महसूल विभागाने सरकारी नियमानुसार नुकसानग्रस्ताना त्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

कपडे व भांडे यांचे नुकसान, मृत जनावरे, तसेच गोठे, दुकाने, टपरी, शेड व हातगाडीधारक, हातमाग कारागीर आणि शेती नुकसान अशा प्रकारच्या नऊ वर्गवारी नुकसानभरपाईसाठी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार २६ हजार ३१३ नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आल. त्यापैकी २५ हजार ९७५ जणांना ३० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ६६३ नुकसानग्रस्त कागदपत्रे न देऊ शकल्याने त्यांना या भरपाईचा लाभ देता आलेला नाही. महाड तहसील कार्यालयामध्ये महापुराच्या नुकसानीचे वाटप करण्याची प्रक्रिया अविरत सुरू होती. अनेक कर्मचारी या कामांमध्ये व्यस्त होते.

सरकारकडून प्राप्त अनुदान – ४२ कोटी ५२ लाख ५८ हजार २००
प्रत्यक्ष वाटप केलेले लाभार्थी – २५ हजार ९७५
प्रत्यक्ष वाटप केलेली रक्कम – २९ कोटी ५२ लाख ५९ हजार ५१०
शिल्लक लाभार्थी – ६६३

- Advertisement -

सरकारकडून प्राप्त झालेल्या अनुदानापैकी बहुसंख्य लाभार्थ्यांना नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात आली आहे. वाटप केलेल्या अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत वर्ग केली जाणार आहे.
– सुरेश काशीद, तहसीलदार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -