घररायगडमाजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र पिंट्या ठाकूर उद्धव ठाकरे गटात 

माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र पिंट्या ठाकूर उद्धव ठाकरे गटात 

Subscribe

काँग्रेसचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा  काँग्रेस चे प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांचे बंधू अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंट्या ठाकूर यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.

 अलिबाग: काँग्रेसचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा  काँग्रेस चे प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांचे बंधू अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंट्या ठाकूर यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.अमीर ठाकूर हे काँग्रेसचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे प्रदेश सचिव तर वहिनी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. संपूर्ण ठाकूर कुटुंब काँग्रेस सोबत असताना अमिर ठाकूर यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशामुळे धक्का बसला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -