घरक्राइमऔरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत कोट्यवधींच्या बनावट बिलांचा घोटाळा उघड

औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत कोट्यवधींच्या बनावट बिलांचा घोटाळा उघड

Subscribe

राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयाने व्यक्त केला आहे.

राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यकर जीएसटी विभाग या बनावट बिलांचा तपास करीत आहे. दरम्यान, जीएसटी विभागाने बनावट बिले लावून जीएसटीची फसवणुक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. फैजल अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीनंतर बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. (Aurangabad gst 500 crore rs scam action taken by the gst department two arrest)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दूल गफार मेवावला आणि मोहोमद अजिज यांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सध्या जवळपास 500 कोटींची बनावट बिले केली होती. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, बोगस कंपन्या स्थापन करत इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश औरंगाबादच्या स्टेट जीएसटी केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटीच्या पुढे आणि गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्याने तपास सुरू केला आहे. तसेच, याप्रकरणी मुंबईत डोंगरी येथून औरंगाबाद स्टेट जीएसटी विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

फरहत इन्टरप्राईडेस या नावानं बनावट बिलाचा प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळे करत होते. याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी 30 आधार कार्ड, पॅन कार्ड, 30 च्यावर सीम कार्डस त्यांच्याकडे आढळून आले. इतकच नव्हे तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली आहेत. यात अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचंही दिसून आलं आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांच्या माध्यमातून आणखी तपास करण्यात येत आहे. या महाघोटाळ्याची व्याप्ती गुजरात यासह विविध राज्यांत असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जीएसटीबाबत राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याने त्याचा तपासही त्याच पद्धतीने औरंगाबाद जीएसटीचा विभाग करीत आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यातून जवळपास 200 कोटी रुपयांची सरकारची फसवणूक झाल्याचे समजते.


हेही वाचा – ‘मुंबईत कलम 144 लागू’ ही चुकीची माहिती, विश्वास नांगरे पाटलांचा खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -