घररायगडप्राण्यांच्या कातडीसह दुर्मिळ चित्रांची तस्करी

प्राण्यांच्या कातडीसह दुर्मिळ चित्रांची तस्करी

Subscribe

जेएनपीटी बंदरात उघड झाला प्रकार

 

 

- Advertisement -

 

उरण: जेएनपीटी बंदरातून पुन्हा एकदा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीमा शुल्क विभागाने केलेल्या तपासणी मोहिमेत कागदोपत्री घरगुती सामानाच्या कंटेनरमधून कोट्यावधी किमतीची प्राण्यांची कातडी आणि प्रसिद्ध चित्रकारांची दुर्मिळ चित्रे हस्तगत करण्यात आली.तसेच एक दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या कंटेनरच्या तपासणीत ३ कोटी रुपये किमतीचे नेकट्राईन फळ आढळले होते.त्यामुळे जेएनपीटी बंदरातून तस्कर मोठ्या प्रमाणात तस्करी करीत आपले गोरखधंदे सुरु ठवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जेएनपीटी बंदरात अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कंटेनर तपासणी होत असतानाही वारंवार तस्करी केल्याच्या घटना समोर येत आहेत.त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

- Advertisement -

कागदोपत्री घरगुती वस्तूंची नोंद
सीमा शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसात केलेल्या दोन तपासणी मध्ये कोट्यावधीचा तस्करी केलेला माल सापडला.मंगळवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने कंटेनरची तपासणी केली असता, कागदोपत्री घरगुती वस्तू असल्याची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र दुर्मिळ वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.

३२ मेट्रिक टन नेकट्राईन फळ हस्तगत
अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्राची कातडी, अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ कलाकृती, लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची ३८ दुर्मिळ चित्रे, असा करोडो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत ३ कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिक टन नेकट्राईन फळ आढळले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -