घरपालघरएसटी बसच्या धडकेने भिंत पडली,मुलाचा मृत्यू

एसटी बसच्या धडकेने भिंत पडली,मुलाचा मृत्यू

Subscribe

परंतु,काही वेळातच चालू बसच्या धक्क्याने भिंत कोसळली आणि त्याखाली दोन मुले दाबली गेली. उपस्थित सुमारे 50 जणांनी भिंत उचलण्याचा प्रयत्न केला.

जव्हार :- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला होणार्‍या अपघाताची मालिका काही केल्या कमी होत नाही. १० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास जव्हार बस स्थानकात एसटी बसने भिंतीला धडक दिल्याने भिंत पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलाच्या पायाची ३ बोटे अक्षरशः चिरडली गेली. जव्हार बस स्थानकामध्ये डहाणू -जव्हार बसने संरक्षक भीतीला ठोकल्याने भिंत अंगावर पडून झालेल्या अपघातात एक ११ वर्षीय बाळाचा नाहक बळी गेला. ओविस मडकिया असे मृत अकरा वर्षीय मुलाचे नाव आहे. तर सिंनाल मोडिया रफिकभाई असे 15 वर्षीय जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. दोघेही गुजरात मधील राजकोट येथील राहणारे आहेत. जखमीला तातडीने नाशिक येथे पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृत झालेल्या मुलाला त्याच्या मूळ गावी शववाहिनीतून पाठवण्यात आले आहे.

एसटी संप जसा मिटला तशी एसटी सुसाट झाली आह.े ना गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र आहे, ना अधिकार्‍यांना प्रवाशांच्या जीवाची पर्वा. कारण जव्हार बस स्थानकातून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.परंतु, चालकांना एकदा परत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे घटनास्थळी नागरिकांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. दिवसागणिक एसटी बसच्या अपघातात वाढ झालेली आहे. बेदरकारपणे एसटी ड्रायव्हर बस चालवत असतात, अशाच प्रकारचा काही लोकांचा अनुभव आहे. अपघातग्रस्त बसचा चालक – वाहक फरार आहेत. पोलीस घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढचा तपास करत आहेत, असे जव्हार पोलीस विभागाकडून कळवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -