पालिकेची आरोग्य यंत्रणा भक्कम होणार; इमारतीसाठी अंदाजित २२५ कोटी खर्च अपेक्षित

महापालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी पालिका हद्दीत ४५० खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला या वेळी बोलताना आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार ‘हिरकणी’ या नावाने भूखंड क्रमांक ८ अ, ८ ब, सेक्टर १८, पनवेल (प.) येथील ८००० चौरस मीटरच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयीन इमारत तळघर, तळमजला ते ०७ मजल्याची असुन या इमारतीच्या बांधकामाकरिता अंदाजित रु. २२५ कोटी खर्च अपेक्षित आहे.

पनवेल: महापालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी पालिका हद्दीत ४५० खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला या वेळी बोलताना आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार ‘हिरकणी’ या नावाने भूखंड क्रमांक ८ अ, ८ ब, सेक्टर १८, पनवेल (प.) येथील ८००० चौरस मीटरच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयीन इमारत तळघर, तळमजला ते ०७ मजल्याची असुन या इमारतीच्या बांधकामाकरिता अंदाजित रु. २२५ कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर हिरकणी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एक्स-रे विभाग, रक्तपेढी, शवागृह तसेच समुपदेशन विभाग अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध असणार आहेत.
संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅब कोरोना काळात सुरु करण्यात आलेली पालिकेची स्वत:ची MOL Expert, कोळीवाडा, पनवेल या नावाने ओळखलेली RTPCR Lab चे संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅबमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. याकरिता अंदाजित रुपये. २ कोटी खर्च अपेक्षित आहे. या लॅबमधून जनतेसाठी मोफत रोगनिदान चाचण्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कोव्हिड रुग्णांच्या उपचाराकरिता सिडको प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेले प्लॉट नं. १ सेक्टर ५ ई, कंळबोली, येथील उपजिल्हा रुग्णालय हे सद्यस्थितीत वापरात नसुन त्याच्या वापरात बदल करुन शहरी समुदाय आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. याकरिता ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल महानगरपालिकेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नव्याने ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता प्राप्त झालेली असुन प्रती नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी अंदाजित रु. २.२५ कोटी खर्च अपेक्षित असुन त्याकरिता रु. २० कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.
शहरी समुदाय आरोग्य केंद्र पनवेल महानगरपालिकेच्या नागरीकांना आंतररुग्ण सेवा तसेच महिलांकरिता प्रसूती सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ५० खाटांचे २ शहरी समुदाय आरोग्य केंद्राकरिता मान्यता प्राप्त झाली आहे.

मोबाईल मेडिकल युनिट
पनवेल क्षेत्रातील महिलांना प्रसुतीच्या सेवा व रुग्णांस आंतररुग्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता सिडको प्राधिकरणामार्फत तळोजा येथे जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. सदर शहरी समुदाय आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी रु. १० कोटी खर्च अपेक्षित आहे. शहरातील झोपडपट्टी भागात व आरोग्य केंद्रापासुन दुर असलेल्या भागामध्ये फिरत्या वाहनाद्वारे नागरीकांना प्राथमिक, उपचारात्मक आणि संदर्भ आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविणेकामी पनवेल महानगरपालिका स्तरावरुन ०४ मोबाईल मेडिकल युनिट प्रस्तावित असुन त्याकरिता रु. १ कोटींची आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे.