घररायगडमहाड एसटी आगाराच्या नव्या इमारतीचे काम रखडले

महाड एसटी आगाराच्या नव्या इमारतीचे काम रखडले

Subscribe

महाडमध्ये सुमारे सहा कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तत्कालीन खासदार अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ७ मार्च २०१९ रोजी भूमिपूजन करण्यात आले. इमारतीचे काम सुरु होताच कोरोनाचे सावट पसरले आणि इमारतीचे काम ठप्प झाले. पुर्णावस्थेकडे चाललेल्या इमारतीचे काम सद्या निधीअभावी ठप्प आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड एस.टी. आगाराच्या, बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून ठप्प झाले आहे. निधीचा अभाव आणि ठेकेदाराने केलेल्या कामाचे थकीत बिल यामुळे हे काम थांबले आगहे. यामुळे प्रवासी व कर्मचार्‍यांना जुन्या धोकादायक इमारतीत वावरावे लागत आहे.

महाड बस स्थानक व आगाराची इमारत पन्नास वर्षे जुनी आहे. बसस्थानकाच्या इमारतींमध्ये असणारे उपहार गृह, बुक स्टॉल, स्नॅक्स दुकाने, आरक्षण कक्ष, कर्मचारी कक्ष तसेच चालक व वाहक यांच्यासाठी असलेले विश्रामगृह याच जुन्या इमारतीमध्ये आहे. परंतु आता ही इमारत जुनी झाल्याने धोकादायक बनली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील महाड आगार व बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या स्थानकातून दररोज शेकडो गाड्यांची ये जा होत असते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच विविध ठिकाणी जाणार्‍या बसेस या ठिकाणी थांबत असतात. तसेच महाड आगारात गाड्यांची दुरुस्ती तसेच इंधन भरणा देखील होत असते. परंतु आता ही इमारत धोकादायक झाल्याने प्रवासी व कर्मचार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे बांधकाम नव्याने करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तीन वर्षापूर्वी तिच्या बांधकामाला मान्यता मिळाली. यानंतर महाड बस स्थानकाच्या जवळील मोकळ्या जागेत बांधकाम सुरू झाले असले तरी ते अल्पावधीतच ठप्प झालेले आहे.

- Advertisement -

या इमारतीचे बांधकाम ठप्प झाल्यामुळे जुन्या धोकादायक इमारतीमध्ये प्रवासी नागरिक तसेच येथील दुकानदारांना आसरा घ्यावा लागत आहे. इमारतीच्या बांधकामासाठी ४ कोटी ४७ लाख रुपये अंदाजित खर्च असून चांगल्या दर्जाचे बस स्थानक व आगाराची इमारत या ठिकाणी होणार आहे. परंतु ठेकेदाराला उर्वरित रक्कम व त्याने केलेल्या कामाची रक्कम मिळत नसल्याने काम ठप्प झाले आहे. याठिकाणी सुमारे एक कोटीहून अधिक रकमेचे काम झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र कामासाठी निधी वर्ग न झाल्याने महाड बस स्थानक व आगाराचे काम ठप्प झालेले आहे. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयातून यासाठी निधी मंजूर केला जात असतो. परंतु लॉकडाऊनमुळे एस.टी. महामंडळाला बसलेला फटका पाहता महाड आगाराच्या इमारतीला निधी कधी वर्ग होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाडमध्ये सुमारे सहा कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तत्कालीन खासदार अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ७ मार्च २०१९ रोजी भूमिपूजन करण्यात आले. इमारतीचे काम सुरु होताच कोरोनाचे सावट पसरले आणि इमारतीचे काम ठप्प झाले. पुर्णावस्थेकडे चाललेल्या इमारतीचे काम सद्या निधीअभावी ठप्प आहे. महाड आगाराकडे एकरमध्ये जमीन उपलब्ध आहे. महामार्गाला लागूनच असलेली जमीन मोकळी असून मधील भागात आगाराची आणि स्थानकाची जुनी इमारत तर मागील बाजूस कार्यालय आणि मेकॅनिकॅल यंत्रणा आहे. ज्या ठिकाणी जुनी इमारत आहे त्या जागेतच इमारतीचे बांधकाम न करताच मधोमध इमारत बांधून जुनी इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. दगडी कामातील जुनी इमारत आजही शाबूत आहे. हीच इमारत दुरुस्त झाली असती तर करोडो रुपये वाचले असते असेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

मुंबई – गोवा महामार्गावरून महाड बस स्थानकात येण्यासाठी एसटीचा रस्ता आहे. हाच रस्ता महाड शहरातील नागरिक व वाहन चालक शहरात प्रवेश करण्यासाठी वापरत असतात. ज्या ठिकाणी एसटीची नवीन इमारत होत आहे तेथील रस्त्याचा भाग इमारत रेषेत येत असल्याने हा रस्ता एसटीने बंद केलेला आहे व त्याऐवजी शेजारून खडीचा कच्चा रस्ता वाहनचालकांसाठी तयार करून दिलेला आहे. परंतु या कच्च्या रस्त्यावरून वाहनचालकांना तसेच महाड मधील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

महाड आगाराच्या इमारतीसाठी निधी नसल्याने हे काम सध्या थांबलेले आहे. ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल सादर केले आहे. त्यातच कोरोना आणि त्यानंतर वाढलेले दर यामुळे पुन्हा वाढीव दराची मागणी झाली आहे. निधी वर्ग होताच काम पुन्हा सुरू केले जाईल

– रोहिदास कांबळे, उपअभियंता, एस.टी. अभियांत्रिकी विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -